Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कोयता गँगनंतर ट्रॅक्टर गँगची दहशत; शेतकऱ्यांची सव्वा कोटींची ट्रॅक्टर चोरली, अखेर पोलिसांनी जेरबंद केलंच
सोलापुरात अनेक शेतकऱ्यांची ट्रॅक्टरे व ट्रॉली चोरीला जात होती. ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीला ट्रॅक्टर गॅंग म्हणून ओळखले जाऊ लागले. बघता बघता ट्रॅक्टर हातोहात लंपास करण्याची कला या टोळीत होती. मोहोळ पोलिसांनी ट्रॅक्टर गॅंग मधील तिघांना जेरबंद करून त्यांच्या जवळील ट्रॅक्टर व ट्राली जप्त केले आहे. पप्पू कुबेर ओव्हाळ, उत्कर्ष उर्फ सोन्या नागनाथ पवार, बंडू कुमार पवार (सर्व रा. खरसोळी ता पंढरपूर) अशी संशयीत आरोपीची नावे आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी अधिकृत माहिती मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे.
चार वर्षांपासून ट्रॅक्टर गॅंग सक्रीय
मोहोळ पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, सन २०१८ पासुन माढा, पंढरपूर, बार्शी व मोहोळ या तालुक्यातील ट्रॅक्टर चोरीच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र संशयीतांचा शोध लागत नव्हता. ही टोळी फक्त ट्रॅक्टर आणि ट्राली चोरी करत असल्याने सोलापूर मध्ये ट्रॅक्टर गॅंगची ओळख निर्माण झाली. शेतकऱ्यांत देखील भीतीचे वातावरण पसरले होते. ट्रॅक्टर गॅंगने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. मोहोळ पोलिसांनी दोन पथके तयार करून ट्रॅक्टर गॅंगचा पर्दाफाश केला व तीन संशयीताना अटक केले.
वाचाः पंतप्रधानांच्या दौऱ्याचा नोकरदारांना फटका, ऐन गर्दीवेळी वर्सोवा-घाटकोपर सेवा बंद ठेवणार
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करत होते
संशयीत आरोपी पप्पू कुबेर ओव्हाळ, उत्कर्ष उर्फ सोन्या नागनाथ पवार, बंडू कुमार पवार (सर्व रा. खरसोळी ता पंढरपूर,जि सोलापूर) हे जो ट्रॅक्टर चोरायचा आहे. त्याच्या चालकाबरोबर सलगी वाढवायचे. साखर कारखाना सह आदी ठिकाणी परिसरात हेरगिरी करत होते. ट्रॅक्टर चालकाशी सलगी वाढवून त्याच्या दिवसभराच्या कामकाजाची बारीक-सारीक माहिती घेत होते. चालक ट्रॅक्टर सोडून किती वेळ जातोय याचा अभ्यास करत होते. ट्रॅक्टर चालकास फसवून ट्रॅक्टर हातोहात चोरून नेत होते. चोरून नेलेल्या ट्रॅक्टरच्या चेसीचा नंबर ग्राइंडरच्या साह्याने घासून टाकत होते व मेकॅनिकच्या साह्याने कागदपत्रे आणून देतो असे सांगून विक्री करत होते. ट्रॅक्टर चोरीच्या तक्रारी वाढल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी गुन्हे अन्वेषण विभागातील कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार केली.तीन संशयीत आरोपींना जेरबंद केले आहे.
वाचाः तांबे, पटोले आणि देशमुखांचे पत्र, काँग्रेसमध्ये घडतंय तरी काय?, महिलांसाठी LIC ची भन्नाट पॉलिसी; वाचा टॉप १० न्यूज
ट्रॅक्टर मालकांनी पोलीस अधीक्षकांचा सत्कार केला
चोरीचे ट्रॅक्टर सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली व चोरीला गेलेल्या ट्रॅक्टर मालकांनी मोहोळ पोलीस ठाण्यात आपला ट्रॅक्टर आहे का हे पाहण्यासाठी एकच गर्दी केली. पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी माहिती देताना सांगितले की,अनेक शेतकरी विविध बँकांची कर्जे घेऊन ट्रॅक्टर विकत घेतात. मात्र ट्रॅक्टरच्या अशा चोऱ्या झाल्या तर त्यांचा पूर्ण प्रपंच उद्ध्वस्त होतो. ज्यांचे ट्रॅक्टर सापडले आहेत त्यांच्याकडून ओळख पटवून त्यांच्या ताब्यात देणार असल्याचे अधीक्षक सरदेशपांडे यांनी सांगितले. ट्रॅक्टर सापडलेल्या ट्रॅक्टर मालकाकडून अधीक्षक सरदेशपांडे व अप्पर अधिक्षक हिंमत जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
वाचाः दोन्ही काँग्रेसमध्ये नागपुरातही गोंधळ, अधिकृत निर्णयाआधीच सुरू केला प्रचार