Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अन् बायकोचा खून करुन २७ वर्षांपूर्वी फरार झालेला मारेकरी पोलिसांच्या हातात अलगद सापडला

9

Pune local news | पोलीस एका आरोपीला पकडायला गावात गेले अन् २७ वर्षांपूर्वी बायकोच्या डोक्यात पाटा घालून फरार झालेला खुनी अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला. रामा पाराप्पा कांबळे ३९व्या वर्षी बायकोचा खून करुन पळून गेला होता. आता तो ६६ वर्षांचा झाला आहे. गेली २७ वर्षे तो फरार होता. राम कोडिंबा बनसोडे असे नाव बदलून तो वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता.

 

Pune Crime news
खुनातील आरोपी २७ वर्षांनी सापडला

हायलाइट्स:

  • २७ वर्षांपूर्वी आपल्या पत्नीचा खून करुन फरार
  • रामा कांबळे हा अधुनमधून कोलनूर गावामध्ये यायचा
  • लग्न करुन सोलापूरच्या पालापूर गावात स्थायिक
पिंपरी: गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि आजुबाजूच्या परिसरातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत आहे. ही सगळी चर्चा सुरु असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सुरु असणाऱ्या एका प्रकरणाच्या तपासादरम्यान एक रंजक प्रकार घडला. पिंपरी-चिंचवड पोलीस गेल्या काही दिवसांपासून लैंगिक छळाच्या एका प्रकरणाचा तपास करत होते. याप्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस उर्से गावात गेले होते. तेव्हा पोलिसांना याठिकाणी २७ वर्षांपूर्वी आपल्या पत्नीचा खून करुन फरार झालेला मारेकरी अलगदपणे तावडीत सापडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी लैंगिक छळाचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. महेश भीमराव कांबळे हा याप्रकरणातील आरोपी होता. हा तपास सुरु असताना रामा पाराप्पा कांबळे या आणखी एका आरोपीचे नाव समोर आले होते. रामा कांबळे याने १९९५ साली आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा खून केला होता. यानंतर रामा कांबळे फरार झाला होता. परंतु, नव्या प्रकरणाचा तपास सुरु असताना रामा कांबळे आणि लैंगिक छळाच्या प्रकरणातील आरोपी महेश कांबळे हे दोघेजण एकाच गावातील असल्याची माहिती समोर आली होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोलनूर हे या दोघांचे गाव आहे. त्यामुळे पोलीस तपासासाठी उर्से गावात पोहोचले. त्यावेळी गावच्या सरपंचांकडे चौकशी करताना पोलिसांनी २७ वर्षांपासून फरार असलेल्या रामा कांबळेचा उल्लेख केला. १९९५ मध्ये चारित्र्याच्या संशयावरून बायकोच्या डोक्यात दगडी पाटा डोक्यात घालून रामा पाराप्पा कांबळे फरार झाला होता. तेव्हा पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. रामा कांबळे हा अधुनमधून कोलनूर गावामध्ये यायचा. पण तो लग्न करुन सोलापूरच्या पालापूर गावात स्थायिक झाला होता, असे गावच्या सरपंचांनी सांगितले.
बनावट स्क्रीनशॉटद्वारे पुणेकर महिलेला गंडा, कपाट खरेदीच्या बहाण्याने साडेसात लाखांची लूट
यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करत पालापूर गावाला भेट दिली. त्यावेळी रामा कांबळे हा त्याच गावात राहत असल्याचे समोर आले. रामा कांबळेने आपले नाव बदलून राम कोंडिबा बनसोडे, असे ठेवले होते. तो उर्से गावातील एका वीटभट्टीवर कामाला होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २० वीटभट्ट्या पालथ्या घालून रामा कांबळेला ताब्यात घेतले. रामा कांबळे याने आपली जुनी ओळख पुसून टाकली होती. त्याने राम बनसोडे या नावाने नवे आधारकार्ड तयार करुन घेतले होते. त्यामुळे इतके दिवस तो पोलिसांच्या नजरेपासून लपून राहण्यात यशस्वी ठरला होता.
१३ वर्षीय मुलीशी शरीरसंबंध, पीडिता २६ आठवड्यांची प्रेग्नंट, पुण्यात १९ वर्षीय तरुणाला अटक

पोलिसांनी रामा कांबळेची ओळख कशी पटवली?

रामा कांबळेने आपले नाव बदलले होते. तो लग्न करुन पालापूर गावात स्थायिक झाला होता. ओळख बदलल्यामुळे तो इतकी वर्षे पोलिसांपासून लपून राहिला होता. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी सर्व धागेदोरे जोडायला सुरुवात केली. रामा कांबळेला दुसऱ्या पत्नीपासून तीन मुले होती. दरम्यानच्या काळात रामा कांबळे अधुनमधून उस्मानाबादमधील कोलनूर येथे जायचा. पहिल्या पत्नीपासूनही रामा कांबळेला मुलगा झाला होता. या मुलाने रामा कांबळेला ओळखले. अखेर पोलीस चौकशीत रामा कांबळेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.