Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Shanishchari Amavasya Remedy : शनैच्छरी अमावस्येला करा ‘हे’ उपाय, होईल शनी कृपा आणि सुखसमृद्धी व मानसन्मानची प्राप्ती
या उपायाने सर्व प्रकारची दुःखे नाहीशी होतात
ज्योतिष शास्त्रानुसार शनी अमावस्येच्या दिवशी काळ्या गाईची पूजा करा. त्या गाईवर दुसरा रंग येणार नाही याची काळजी घ्या. पूजेच्या वेळी त्या गाईला आठ बुंदीचे लाडू खाऊ घाला आणि नंतर सात वेळा प्रदक्षिणा घाला. यानंतर गाईची शेपटी आठ वेळा डोक्यावरून फिरवा. असे केल्याने शनिदोष दूर होतो आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने सर्व दुःख, संकटे दूर होतात.
या उपायाने तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळते
शनिश्चेरी अमावस्येच्या एक दिवस आधी काही वस्तू जमा कराव्या लागतात. यामध्ये तुम्ही ११ नारळ पाणी, ४००-४०० ग्रॅम काळी-पांढरी तिळ, ८ मुठी जव, ९ खिळे, ८ मूठ काळे हरभरे, ८ मूठ कोळसा घ्या. यानंतर, अमावास्येच्या दिवशी संध्याकाळपूर्वी, या सर्व वस्तू एका नवीन काळ्या कपड्यात बांधा आणि तो कपडा आपल्या पायापासून डोक्यापर्यंत सात वेळा फिरवा. यानंतर नदीच्या काठावर पूर्व दिशेला तोंड करून १-१ करून सर्व वस्तू वाहून टाकाव्यात. असे केल्याने शनी साडेसाती आणि दशेचे दोष दूर होतात आणि आर्थिक सुबत्ता येते.
या उपायाने जीवनात समृद्धी येते
शुक्रवारी दीड पाव काळे उडीद काळ्या कपड्यात बांधून सोबत ठेवा आणि झोपा. आपल्या जवळ दुसरे कोणीही झोपणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर शनिवारी ते शनी मंदिरात ठेवा. तसेच संध्याकाळी काळ्या सुरमाची एक डबी घेऊन ती डोक्यापासून पायापर्यंत नऊ वेळा फिरवून एखाद्या निर्जन ठिकाणी जमिनीत गाडून टाकावी. असे केल्याने शनिदोष दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी येते.
या उपायाने नोकरीत प्रगती होईल
शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करा. पिंपळाच्या मुळास दूध व पाणी अर्पण करावे व नंतर पिंपळाच्या पाच पानांवर पाच प्रकारची मिठाई ठेवावी त्यानंतर तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा घालाव्यात. तसेच, शक्य असल्यास, एक पिंपळाचे झाड लावा आणि रविवार वगळता दररोज पाणी द्या. असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि नोकरी-व्यवसायात प्रगती होते.
या उपायाने शनिदेवाची कृपा प्राप्त होते
शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी नवग्रह मंदिरात जाऊन शनी देवाची पूजा करावी. तसेच दशरथ व शनी चालीसा मार्फत शनी स्तोत्राचे पठण करा आणि नंतर शनी देवाच्या मंत्राचा जप करा. यानंतर शनी देवाला तेल, काळे तीळ आणि निळी फुले अर्पण करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन त्यांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.