Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मिट्ट काळोख, रात्रीचे १२ वाजलेले, दिसेल त्याला हात करायची, पण विजयाच्या एका कृतीनं सगळ्यांचं मन जिंकलं!

8

पुणे : मुलगी एकटी दिसली की तिच्यावर घारीसारखी नजर ठेऊन तिच्यासोबत नको ते कृत्य होताना आपण अनेकदा आपण बातम्यांमधून वाचत असतो. पण त्याच समाजात काही चांगल्या घटनाही समोर येतात. अबला महिला मुलींना मदत करणारे काही सद्पुरुषही असतात. पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गँगचा नंगानाच आपल्या पाहण्यात-ऐकण्यात आला असेल. पोलीस त्यांच्यापरीने गँगमधल्या आरोपींच्या मुसक्या आवळतायेत. पण त्याच पुण्याच्या बारामतीत एका अबला मुलीला रात्री १२ वाजता मदत करणारा आणि पोलिसांच्या मदतीने तिला संकटातून सोडवणाऱ्या तरुणाचं राज्यभर कौतुक होतंय.

बारामतीत एक १२वी मधील मुलगी दोन दिवसांपासून आपलं घर सोडून निघून आली होती. ते एका विजय कांबळे नावाच्या तरुणाच्या लक्षात आलं. त्याने एका मच्छिंद्र टिंगरे नावाच्या व्यक्तीला कॉल करुन कळवलं. त्यानं सांगितलं की, “सर एक १७ वर्षांची मुलगी आहे. बारामतीच्या बस स्टॅन्डवर रडतं होती. ती म्हणतेय मी घर सोडून निघून आलीय. मला पुण्याला जायचंय, माझ्याकडे पैसे नाहीत. ती कोणत्याही वाहनाला हात देतेय. पण वाहन थांबत नसल्यामुळे ती रडतेय.

दाऊद कनेक्शनमुळे जेलमध्ये गेले होते ब्रजभूषण, अटलजींनी करून दिली होती सावकरांची आठवण

“मी तिला पैसे देतो असं म्हणून विश्वासात घेऊन गार्गी हॉटेलमध्ये घेऊन आलोय पण पुढं काय करावं मला काही समजेना झालयं”. टिंगरे यांनी विजयला सांगितलं की, “फक्त दहा मिनिटे तिला थांबवून ठेव. मी पोलिसांना कळवतो”. टिंगरे यांनी लागलीच DYSP इंगळे आणि PI महाडिक यांना सर्व प्रकरणाची माहिती दिली. त्यांनंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ आपल्याकडे हजर असलेले कर्मचारी पाठवले.

हॉटेल गार्गीमध्ये त्या मुलीशी पोलिसांनी चर्चा केली परंतू ती अत्यंत दुखावलेल्या अवस्थेत होती. इयत्ता बारावीत शिकत असणारी मुलगी आई वडिलांशी वाद झाला म्हणून दोन दिवसांपासून घर सोडून निघून आली होती. काही वेळात मच्छिंद्र टिंगरे देखील तिथे पोहोचले आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित मुलीला विश्वासात घेऊन ताब्यात घेतलं.

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी भरती, जाणून घ्या तपशील

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.