Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वाय. टी. एंटरटेन्मेंट कंपनीने या प्रकरणात मेसर्स सनराईज पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व या कंपनीचे संचालक अब्दुल सिद्दिकी आणि मेसर्स राजकुमार संतोषी सिनेमा कंपनीचे राजकुमार संतोषी यांच्याविरोधात २०१४मध्येच दावा दाखल केला आहे. त्यातच कंपनीने अॅड. अनुज नरुला यांच्यामार्फत तातडीचा अर्ज दाखल केला होता. त्यावरील सुनावणीनंतर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. डी. इंगळे यांनी शुक्रवारी (२० जानेवारी) हा आदेश दिला. हा आदेश काही दिवस स्थगित ठेवण्याची विनंती संतोषी यांच्या वकिलांनी लगेच एक अर्ज देत केली. त्याला नरुला यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर ‘संतोषी यांना रोखीची हमी न्यायालयात जमा करण्यासाठी पाच दिवसांचा अवधी दिलेला असल्याने या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयात अपिल करण्याचा मार्गही त्यांना खुला आहे’, असे स्पष्ट करत न्यायाधीशांनी तो अर्ज फेटाळला.
क्लिक करा आणि वाचा- डमी ग्राहक पाठवला, चक्क महिलाही करत होती हे काम, पोलिसही चक्रावले.. महिलेसह दोघे अटकेत
दरम्यान, ‘न्यायालयाच्या या आदेशाची प्रत आम्ही पीव्हीआर पिक्चर्स, युएफओमुव्हीज व अन्य संबंधितांना ईमेलद्वारे पाठवली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन होण्याबाबत त्यांना कळवले आहे’, अशी माहिती अॅड. नरुला यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.
काय आहे प्रकरण?
‘आम्ही मेसर्स सनराईज पिक्चर्सला अडिच कोटी रुपये दिले होते. त्या पैशांची परतफेड करण्याबाबत करारनामा करताना, राजकुमार संतोषी हे आम्हाला ५० लाख रुपये देणे असल्याने ते ती रक्कम तुम्हाला परस्पर देतील, असे सनराईज पिक्चर्सने म्हटले होते. संतोषी यांनीही ते मान्य केले होते. त्यानंतर संतोषी यांनी जगात कुठेही त्यांची निर्मिती वा दिग्दर्शन असलेला किंवा त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असलेला पुढचा सिनेमा प्रदर्शित होत असताना वाय. टी. एंटरटेन्मेंटला ५० लाख रुपये द्यावे, असे सनराईज पिक्चर्सने २१ जुलै २०११च्या पत्राद्वारे स्पष्ट केले.
क्लिक करा आणि वाचा- एकीकडे महागाईचा भडका, दुसरीकडे साबण, टूथपेस्ट, शॅम्पू अशा वस्तूंच्या किमती वाढू शकतात, कारण जाणून घ्या
सनराईज पिक्चर्ससोबतच्या २७ जुलै २०११च्या तडजोडीच्या करारनाम्यातही ते पत्र समाविष्ट आहे. परंतु, डिसेंबर-२०११मध्ये संतोषी यांचा फटा पोस्टर निकला हिरो, हा सिनेमा प्रदर्शित होऊनही आपण या सिनेमाचा निर्माता व दिग्दर्शक नसून केवळ दिग्दर्शक आहोत, असे कारण देत संतोषी यांनी पैसे देण्याचे टाळले. संतोषी यांच्याकडून करारनाम्याचे उल्लंघन करत पैसे देणे टाळले जात असल्याचे पाहून आम्ही दावा दाखल केला आहे. आता संतोषी यांचा गांधी गोडसे-एक युद्ध सिनेमा येत असल्याचे आम्हाला कळले. आता ते आपण या सिनेमाचा निर्माता नसून पत्नी किंवा कंपनी आहे, असे कारण देत पुन्हा टाळाटाळ करण्याची शक्यता आहे.
क्लिक करा आणि वाचा- लघुशंका प्रकरणी एअर इंडियावर मोठी कारवाई; ठोठावला ३० लाखांचा दंड, पायलट निलंबित
पैसे देण्याची आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा त्यांचा हेतू दिसत नाही. त्यामुळे त्यांना आधी ५० लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश द्यावा आणि तसे न केल्यास त्यांच्या सिनेमाच्या प्रदर्शन रोखावे. तसेच सिनेमाच्या संबंधित साहित्यांवर टांच आणून त्यावर कोर्ट रिसिव्हर नेमावा’, अशी विनंती वाय. टी. एंटरटेन्मेंटने आपल्या अर्जात केली होती.