Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची सहल २० जानेवारी रोजी रायगड किल्ला पाहण्यासाठी आली होती. याचवेळी ओमकारने आपल्या शिक्षकांकडे रायगड सर करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याची जिद्द आणि चिकाटी पाहून यासाठी पालकांनीही त्यासाठी संमती दिली. त्यानंतर शिक्षक देखील त्याला सहलीला घेऊन गेले. पण तो रायगड सर करेल का? अशी चिंता शिक्षकांना सतावत होती. मात्र, बघता बघता त्याने सर्वांच्या सोबतीने अवघ्या सव्वा दोन तासांत रायगड किल्ला सर केला. त्याची ही जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्ती अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे.
श्रीगौड ब्राम्हण समाजाच्या जातपंचायतीची मनमानी, पोटजातीत लग्न केल्याने २३ वर्षे वाळीत टाकलं, गुन्हा दाखल
मनात जिद्द असली तर आपण काहीही करु शकतो, याचे उत्तम उदाहरणच ओमकारने दाखवून दिलं आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ओमकारने पाय नसताना देखील इच्छाशक्तीच्या जोरावर रायगड किल्ला सहज सर केला आहे. ओमकार सर्वसामान्य मुलांसारखाचं आहे. पण दुर्दैवाने एका अपघातात त्याला आपला उजवा पाय गमवावा लागला, अशी माहिती त्याच्या शिक्षकांनी दिली.
ज्या दिवशी विद्यानिकेतन शाळेतील सहल रागडवर घेऊन जाणार होते. तेव्हा रायगडवर ओमकारला रोप-वेने घेऊन जाऊ असं शिक्षकांनी ठरवलं होतं. परंतु, रायगडच्या पायथ्याशी पोहचल्यानंतर त्याने “मला पायऱ्या सर करूनच रायगडवर जायचं आहे”, असं सांगितलं. काही क्षण स्तब्ध होऊन, शिक्षकांनी होकार देत ओमकरच्या पाठीवर थाप दिली. त्यानंतर ओमकारने इतर मुलांसह दोन तासात एक-एक पायरी चढून रायगड सर केला. त्यावेळी ओमकारचा उत्साह बघण्यासारखा होता, असं त्याच्या शिक्षकांनी सांगितलं.