Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कलाकेंद्रत नृत्यासाठी मुली देण्याचा बहाणा करत लुटणारी टोळी कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

16

कर्जत दि.२४ :- उस्मानाबादच्या एका कलाकेंद्रावर संगीत पार्टीत नृत्य करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे येतो असा खोटा बहाणा करून संबंधित पार्टीला आपल्याकडे बोलावून त्यांच्याकडून उचल घेऊन व चाकूचा धाक दाखवून रात्रीच्या अंधारात मारहाण करून व जबरदस्तीने रोख रक्कम,सोने, मोबाईलवर लुटणाऱ्या दोघांना कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. सविस्तर माहिती अशी,’सुरज भूषणराव आंबेकर (रा.लातूर हल्ली आळणी ता.जि.उस्मानाबाद) यांचा संगीत पार्टीचा व्यवसाय असून ते आळणीफाटा येथे पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र येथे पार्टी चालवतात. त्यांच्या पार्टीत एक नर्तिका कामाला असून तिचे सोशल मीडियावर वेगवेगळे अकाउंट आहेत. इन्स्टाग्रामवर नृत्याचे विविध व्हिडीओ अपलोड करत असल्याने तिचे अनेक फॉलोवर्स आहेत.आरती भोसले या अकाउंटवरून तिची ओळख झाली होती व अधूनमधून फोनवर बोलणे होत होते.मागील दहा दिवसांपासून आरती भोसले (रा.राशीन) ही ‘मला तुमच्या पार्टीत काम करायचे आहे’ असे म्हणत होती.आणि फिर्यादीला पार्टीत नर्तिकांची गरज होती.त्यामुळे उचल देऊन तिला पार्टीत घेण्याचे ठरले. दि.२० रोजी ‘७० हजार घेऊन या ते घरी द्या आणि दोन मुली आहेत व त्यांना प्रत्येकी ४० हजार घेऊन या’ असे आरती भोसले हिने सांगितले. व फिर्यादी व अन्य चार जन राशीन येथे घरी न बोलवता करमाळा रोड वर बोलवले. रोख ७० हजार दिले.अन्य दोन मुली पुढे राहतात असा बहाणा करून गाडी अज्ञातस्थळी आणल्यावर दोन अनोळखी मुली व अनोळखी इसम गाडीच्या दिशेने चालत आले.मुलींना देण्यासाठी रोख रक्कम नसल्याने एटीएममधून पैसे काढतो असे फिर्यादीने सांगितले.गाडीत बसताच लपून बसलेल्या सात ते आठ इसमांनी फिर्यादीला मागून पकडले व खाली पाडले गळ्यातील सोन्याची चैन काढून घेऊन खिशातील पाकीट व हातातील अंगठी काढून घेतली.त्यानंतर एकाने चाकूचा धाक दाखवून चालकाकडून मोबाईल व पाकीट बळजबरीने घेतले.गाडीत बसलेल्या फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. फिर्यादीच्या बरोबर आलेल्या सचिन कापसे यांना मारहाण करून त्यांच्या हातातील अंगठी व खिशातील पाकीट काढून घेऊन त्यांना कॅनॉलमध्ये ढकलून दिले.वाहनात बसलेल्या सहचालकाचा मोबाईल काढून घेतला. सोबत असलेली नर्तिका हिला मारहाण करून मोबाईल काढून घेतला. या गुन्ह्यात एकूण १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला असल्याची कर्जत पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरच्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. शोध घेऊन दोन आरोपींना अटक करण्यात आली असून चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित पोलीस जवान मारुती काळे भाऊ काळे अर्जुन पोकळे श्याम जाधव संपत शिंदे महादेव कोहक मनोज लातूरकर गणेश भागडे संभाजी वाबळे नितीन नरुटे यांनी केले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.