Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा?; ‘त्या’ प्रचारसभेमुळं चर्चेला उधाण

33

धुळेः नाशिक विभागीय मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अद्याप कुणालाही पाठिंबा दिला नसला तरी शिरपूरमध्ये मात्र भाजपचे दिग्गज नेते व माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या संस्थेत मात्र सत्यजीत तांबे यांचा प्रचार मेळावा दणक्यात पार पडला आहे.

भाजपचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे हे स्वत: व त्यांच्या संस्थेचे कर्मचारीही मेळाव्यात सक्रीय सहभागी झाले होते. त्यामुळे पक्षाची भूमिका गुलदस्त्यात पण नेते, मात्र सत्यजित तांबेंच्या पाठिशी असे चित्र निर्माण झाले असून या प्रकाराची चर्चा जिल्ह्यात सध्या जोरदार सुरु आहे.

शिरपूर येथील माजी शिक्षणमंत्री व भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार अमरीशभाई पटेल यांच्या संस्थेत काल सायंकाळी सत्यजीत तांबे यांची प्रचारसभा पार पडली. अमरीश भाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील सर्व संस्थांचे सर्व प्राचार्य, शिक्षक हजर होते. त्यांच्यासोबतच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या किसान विद्या प्रसारक संस्थेतील कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुषार रंधे यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्‍यांनी तांबे यांच्या विजयाचे आवाहनही केले.

अपघातानंतर तापी नदीत कोसळलेला ट्रक गेला तरी कुठे? ड्रायव्हरही बेपत्ता, पोलिसही हैराण

सत्यजित तांबे यांनी आपल्या उमेदवारीची पार्श्वभूमी सांगून आगामी उद्दिष्टांबाबत माहिती दिली. सभा आटोपल्यानंतर त्यांनी राजकीय प्रतिक्रिया देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. उपस्थित संस्थाचालकांनीही आमचे सत्यजित तांबे यांच्या कुटुंबाशी असलेले ऋणानुबंध आणि डॉ.सुधीर तांबे यांनी प्रत्येक घटकास केलेले सहकार्य यामुळे सत्यजित तांबे यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले.

वाचाः क्रूड ऑईलचा दर घसरला; पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, १L साठी किती पैसे मोजावे लागणार

मी डाव्या विचारांचाः सत्यजित तांबे

सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत पब्लिक पॉलिसी या विषयांतर्गत अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांचा प्रचार केल्याची माहिती दिली. ट्रंप यांचा पक्ष आपल्याकडच्या भाजपप्रमाणे उजव्या विचारांचा आणि मी डाव्या विचारांचा पण विरोधी पक्ष कसे काम करतो हे पाहण्यासाठी शिक्षकांच्या आज्ञेवरुन त्यांच्यासाठी काम केल्याचे सत्यजित तांबे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

वाचाः सोमवारी अर्ध्या मुंबईत पाणी नाही, या तारखेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.