Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Shraddha Walker Murder : आफताबने श्रद्धाची हत्या का केली? अखेर पोलिसांनी समोर आणलं खरं कारण…

49

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मंगळवारी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. एका मित्राला भेटल्याने संतापलेल्या लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला याने तिची हत्या केली, असा निष्कर्ष या आरोपपत्रात काढण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी आफताबची न्यायालयीन कोठडी ७ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली.

श्रद्धा हत्या प्रकरणात पोलिसांनी साकेत न्यायालयात ६६२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले. यामध्ये हत्येचे ताजे कारण म्हणून हा घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. श्रद्धाच्या एका मित्राचा आफताब राग करीत असे. हत्येच्या दिवशी श्रद्धा त्यालाच भेटण्यासाठी गेली होती. ती घरी परतल्यावर आफताब रागवला व हिंसक बनला. त्यानंतर त्याने श्रद्धाची हत्या केली. आफताबने हत्येनंतर श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी विविध हत्यारे वापरली होती व ती सर्व त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहेत, असेही आरोपपत्रात म्हटले आहे. या खटल्यामध्ये पोलिसांनी १५० जणांची साक्ष नोंदवली आहे व आफताबवर भारतीय दंड विधान कलम ३०२ (हत्या) व २०१ (पुरावे नष्ट करणे) हे आरोप ठेवण्यात आले आहेत.

पोलिसांना बघून दोघं दचकली, सहज झडती घेतली अन् अधिकाऱ्यांना फुटला घाम
महाराष्ट्र पोलिसांकडून दिल्लीच्या मेहरोली पोलिसांना श्रद्धा बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला व श्रद्धाच्या वडिलांकडे चौकशी करण्यात आली. श्रद्धा व आफताबला त्यांच्या घरातच अखेरचे पाहण्यात आले होते. त्याच अनुषंगाने आफताबची पोलिसांनी चौकशी केली व १२ नोव्हेंबर रोजी त्यास अटक करण्यात आली. चौकशीत आफताबने सांगितल्याप्रमाणे श्रद्धाच्या शरीराचे अवयव शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. या प्रकरणात अधिक चौकशीसाठी पोलिसांनी नऊ पथके स्थापन केली व एका विशेष चौकशी पथकाचीही नेमणूक केली. ही पथके हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली तसेच गुरगावमध्ये धाडण्यात आली होती. विविध डिजिटल पुरावे, मोबाइल फोन, कॅमेरा, लॅपटॉप, कॉलबाबतची माहिती तसेच जीपीएस लोकेशन अशा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या आरोपपत्रात आफताबला प्रमुख आरोपी म्हणून सादर केले आहे.

VIDEO पाहाच! कोयता गँगने भर रस्त्यात नाचवले कोयते, पोलिसांनी पकडल्यानंतर असा दाखवला खाक्या

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.