Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इतिहासाचे साक्षीदार! ८ जलदुर्गांचा युनेस्कोच्या यादीत समावेश होण्यासाठी उचलले मोठं पाऊल

10

पुणेः समस्त शिवप्रेमींसाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील आठ जलदुर्गांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश करण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र गड-किल्ले संवर्धन समितीने राज्यातील आठ जलदुर्गांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्याची विनंती करणारा प्रस्ताव पाठवण्याच्या विचारात आहे.

समितीकडून केंद्र सरकारला लवकरच हा प्रस्ताव पाठवण्यात जाईल. तसंच, राज्याकडून असा प्रस्ताव दुसऱ्यांदा पाठवण्यात येत आहे. या आधीही शिवछत्रपतींच्या कालखंडातील १४ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तो तत्त्वता स्विकारण्यात आला आहे. सदर स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याबाबत युनेस्को विचार करु शकते, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

वाचाः दौंडमधील सात जणांच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, पोलीस तपासात झाला मोठा उलगडा

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७व्या शतकातील जलदुर्ग आणि त्याकिल्ल्यांचा पूर्वीच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमुळं जलदुर्गांचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये वसई, जंजिरा, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, यशवंतगड, बाणकोट, अर्नाळा, कुलाबा या समुद्रकिल्ल्यांचा समावेश आहे.

मध्ययुगीन काळात भारतात व्यापाऱ्याच्या दृष्टीने तुर्क, अरब आणि युरोपीय लोकं प्रथम सागरीमार्गाने कोकणात आले. कोकण किनारपट्टीवरील सर्व किल्ले हे इतर देशांसह विविध संस्कृतीच्या एकत्रीकरणाचे केंद्र आहेत. तसंच, कोकण किनारपट्टी ही गनिमी युद्धाच्या रणनीतीची मांडणी करण्यासाठीही उत्तम होती. त्यामुळं कोकणात अशा अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पाऊलखुणा आहेत ज्या युनेस्कोला आकर्षित करु शकतात, असं एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

वाचाः सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा?; ‘त्या’ प्रचारसभेमुळं चर्चेला उधाण

दरम्यान, किल्ले संवर्धन समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली, त्यात सदस्यांकडून विविध सूचनादेखील देण्यात आल्या होत्या. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार या शिफारशींबाबत योग्य तो निर्णय घेतील, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.

वाचाः क्रूड ऑईलचा दर घसरला; पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, १L साठी किती पैसे मोजावे लागणार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.