Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

५ वर्षांची चिमुकली घराजवळ खेळत होती, काही कळण्याच्या आत हिंस्त्र प्राण्याने तिला ओढत नेले, घडला मोठा अनर्थ

7

मनमाड :चांदवड तालुक्यातील निमोण येथील ५ वर्षीय सेजल सोमनाथ जाधव ही सकाळी घरा जवळ खेळत असताना झाडाझुडुपांमधून आलेल्या हिंस्त्र प्राण्यांने सेजलला शेतात नेत ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे , या घटनेने संपूर्ण निमोण सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील निमोण शिवारात सोमनाथ जाधव हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. बुधवारी (दिनांक २५ जानेवारी) सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांची ५ वर्षांची मुलगी सेजल ही घराबाहेर खेळत होती. इतक्यात तिच्या मागच्या बाजूने एक हिस्त्र प्राणी आला. या हिंस्त्र प्राण्यांने तिला उचलून जवळच्या कांद्याच्या शेतात नेले.

क्लिक करा आणि वाचा- तोंडाला रुमाल बांधून घरात शिरले, महिलेचा विनयभंग केला, घरातील लाखोंचा ऐवजही लुटला, गावात एकच खळबळ

यावेळी या प्राण्याने लगानग्या शेजलच्या शरीराचे लचके तोडल्याने चिमुकल्या सेजलचा जीव गेला. थोड्या वेळाने सेजल अंगणात कुठे दिसत नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनीं तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेच आढळली नाही. त्यानंतर त्यांनी तिचा आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला. त्यावेळी त्याला जे दृश्य दिसले ते अतिशय धक्कादायक होतं.

सेजलच्या कुटुंबीयांना आपली मुलगी शेजल ही सेजल कांद्याच्या शेतात मृत अवस्थेत दिसून आली. तिच्या शरीराचे लचके तोडण्यात आल्याचे दिसत होते. या वेळी हे धक्कादायक दृश्य पाहून सेजलच्या आई वडिलांनी एकच टाहो फोडला.

क्लिक करा आणि वाचा- भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; पोलिसांनी दिला इशारा, मुख्य आरोपी शरण आला

या घटनेची माहिती मिळताच निमोण गावच्या सरपंच डॉ. स्वाती देवरे, डॉ. भाउराव देवरे हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना पंचनामा करण्यास बोलवले होते.

क्लिक करा आणि वाचा- कॅन्सरच्या लास्ट स्टेजवर होती महिला; तो तिच्यासाठी होता वेडा, हॉस्पिटलमध्येच केले लग्न, नर्स, डॉक्टर साक्षीदार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.