Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वाचा: सुरू झाला जबरदस्त सेल, iPhone 14 वर ९००० रुपयांची सूट, इतर फोन्सवरही ऑफ
OnePlus 10T मध्ये काय खास?
हा फोन 16GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज पर्यायात येतो. प्रोसेसर म्हणून यामध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. डिस्प्लेबद्दल सांगायचे तर, फोनमध्ये ६.७ -इंचाचा फुल एचडी+ फ्लुइड एमोलेड डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले १२० Hz च्या रीफ्रेश दर आणि ३६० Hz च्या टच सॅम्पलिंग दरासह येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देखील देत आहे.
वाचा: घरच बनेल थिएटर ! १४००० रुपयांच्या ऑफसह खरेदी करा मोठ्या Screen चा Smart TV
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप:
फोनच्या मागील पॅनलवर, तुम्हाला एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसेल. यामध्ये ८-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि ५०-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह २ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी फोनच्या समोर १६ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
फोनमध्ये ४८००० mAh बॅटरी:
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये ४८००० mAh बॅटरी आहे, जी 150W Super VOOC चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर, OnePlus 10T 5G Android 12 वर आधारित Oxygen OS 12.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, एनएफसी, जीपीएस आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत.
वाचा: या Airtel प्लान्समध्ये Disney Plus Hotstar मिळेल मोफत, सोबत रोज 2.5GB पर्यंत डेटा सुद्धा