Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पन्नास किलो साखरेचे पोतो घेऊन एक किलोमीटर अंतर कमीत कमी वेळेत पार करण्याच्या या स्पर्धा मोठ्या चुरशीने संपन्न झाल्या आहेत. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून १४ हमाल बांधवांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये ५० किलोचे साखरेचं पोतं घेऊन एक किलोमीटर कमी वेळेत धावण्याचा या स्पर्धेमध्ये मिरज तालुक्यातल्या आरग येथील रेल्वे धक्क्यावरील हमाल भारत खांडेकर याने ५० किलो वजनाचे साखरेचे पोते घेऊन अवघ्या ३ मिनिट ४९ सेकंदांमध्ये एक किलोमीटरचं अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
क्लिक करा आणि वाचा- सोडली लाज, घेतली लाच; प्रजासत्ताक दिनीच ग्रामसेवकाचा प्रताप, असे पकडले रंगेहाथ
तर कोल्हापूरच्या श्रावण पाटील या हमालाने ३ मिनिटं ५७ सेकंद मध्ये हे अंतर पार केलं त्यामुळे त्याचा द्वितीय क्रमांक आला आणि सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी येथील नवनाथ बंडगर या हमालाने ४ मिनिटे ०६ सेकंदात हे अंतर परत करत तिसरा क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या हमालास रोख ११,१११ व शिल्ड तर द्वितीय क्रमांकास ९,९९९ आणि शिल्ड व तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यास ७,७७७ रोख रक्कम व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा- श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकून उडवून देण्याची धमकी; हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल
या स्पर्धेचे आयोजक हमाल संघाचे नेते विकास मगदूम म्हणाले की, हमालांमधील असणाऱ्या कला गुणांना वाव मिळावा, तसेच आरोग्य निरोगी राहण्याच्या उद्देशाने दरवर्षी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते आणि या स्पर्धांना उस्फूर्त असा प्रतिसाद मिळतो. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतून हमाल सहभागी होत असतात. ही स्पर्धा पाहण्यासाठी हमाल बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
क्लिक करा आणि वाचा- प्रजासत्ताक दिन म्हणजे काय रे बाबा?, धनंजय मुंडेंच्या लेकीचा व्हिडिओ तुफान व्हायरल; मुलीला सांगितले मर्म