Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील जिल्ह्याचे योगदान अभिमानास्पद : पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

7

नाशिक, दिनांक 26 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय स्वांतत्र्य संग्रामातील जिल्ह्याचे योगदान अभिमानास्पद आहे. जिल्ह्यातील शौर्यगाथांच्या रूपाने स्वातंत्र्य संग्रामाला कोंदण लाभले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनी पोलीस संचलन मैदान येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी जतिन रहेमान यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारक व शहीदांच्या कार्याचे ऋण फेडणे अशक्य असून त्यांचे कार्य व बलिदान सर्वांना कायमस्वरूपी प्रेरणा देणारे आहे. आजही देशाच्या रक्षणासाठी आपले जवान देशाच्या सीमांवर रात्रंदिवस पहारा देत सज्ज असल्यानेच त्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळेच आज आपण सुरक्षित जीवन जगत आहोत, असे पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन साजरा करतांना या वर्षात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात ‘हर घर तिरंगा’ मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात साधारण 10 लाख 496 शासकीय, निमशासकीय इमारती, घरे यांच्यावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता. तसेच या मोहिमेच्या माध्यमातून नाशिक येथील सरकारवाडा, चांदवड येथील रंगमहाल, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भगुर येथील जन्मस्थळ, निळकंठेश्वर मंदिर, सुरगाणा मधील हतगड किल्ला, रामशेज किल्ला, अंकाई, कवनाई तसेच मालेगाव येथील किल्ल्यावर देखील 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकविण्यात आला होता. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात 75 फुटांचा ध्वजस्तंभ व संविधान स्तंभाची उभारणी करण्यात आली असल्याचे पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या भगुर येथील जन्मस्थळी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या वारसांना देखील प्रशासनाच्या वतीने गौरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विभिषिका स्मृती दिन, स्वराज्य सप्ताह यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रशासनाने यशस्वीरित्या केले असल्याची बाब उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचेही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी नमूद केले.

पौराणिक, ऐतिहासिक व संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेल्या जिल्ह्याच्या स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण झाली असून राज्यातील महत्त्वपूर्ण जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या परंपरेमुळे जिल्ह्याचे महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखीत केले गेले असल्याचे ही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या वेळी पोलीस विभाग, अग्नीशमन दल, होमगार्ड विभाग व भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन सादर केले. तसेच आरोग्य विभागामार्फत 108 रूग्णवाहिका, कृषी विभागाचा तृणधान्य वर्षानिमित्त तयार करण्यात आलेला चित्ररथ यांचे संचलन देखील यावेळी झाले. विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले.

या कार्यक्रमात उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलनासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांचा स्मृतीचिन्ह देवून विशेष सत्कार करण्यात आला.

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात यांचा झाला सन्मान

  • देशांतर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन स्नीलिओपार्ड मोहिमेतंर्गत ह्युलीयांग, अरुणाचल प्रदेश येथील आंतराष्ट्रीय सीमेजवळ ऑपरेशन ड्युटीवर कर्तव्य बजावतांना शहीद लान्स नायक प्रसाद कैलास श्रीरसागर यांच्या वीरमाता मंजुषा कैलास क्षीरसागर यांना रूपये 1 कोटीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
  • राष्ट्रीय रायफल मध्ये सेवारत असतांना आतंकवादी मुठभेडमध्ये अपंगत्व आलेल्या मंगेश नामदेव शिंदे यांच्यासह त्यांच्या मातापितांना ताम्रपट देण्यात आले

 

  • उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षक पदक 2020-21

श्री. महादेव मधुकर खंडारे, राखीव पोलीस निरीक्षक

श्री. गणेश महादेव काकड, पोलीस नाईक

  • मा. राष्ट्रपती, भारत सरकार यांचे गुणवत्तापुर्ण सेवापदक

श्री. रविंद्र गुणवंतराव मगर, आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस निरिक्षक

  • सर्वोत्कृष्ठ अपराधसिद्धी पुरस्कार

श्री. दत्तात्रय राजाराम कडनोर, सहा. पोलीस उपनिरीक्षक

  • गुणवत्तापुर्ण सेवापदक

श्री. सुकदेव खंडु मुरकुटे, सहा. पोलीस उपनिरीक्षक

  • पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5वी)

सी. बी. एस. ई. आ. सी. एस. ई. विभाग

  1. निहार पराग देशमुख-92.62 टक्के राज्यस्तरीय क्रमांक-4
  2. गार्गी सचिनकुमार दहिवळकर-87.92 टक्के राज्यस्तरीय क्रमांक-10
  • पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (8वी) ग्रामीण विभाग
  1. स्मित महेश निकम-91.95 टक्के राज्यस्तरीय क्रमांक-3
  • पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (8 वी) सी. बी. एस. ई., आ. सी. एस ई विभाग
  1. रिद्धी अविनाश पवार-82.55 टक्के राज्यस्तरीय क्रमांक-11
  2. गार्गी राहूल जोशी-81.88 टक्के राज्यस्तरीय क्रमांक-12
  3. चिन्मय अजय पाटील-81.88 टक्के राज्यस्तरीय क्रमांक-12
  4. सोहम संजय कलोगे-80.54 टक्के राज्यस्तरीय क्रमांक-14
  • आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनअंतर्गत रूग्णालयांना प्रशस्तीपत्र
  1. एस. एम. बी. टी. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च सेंटर
  2. सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नाशिक
  • जिल्हास्तरीय लघु उद्योग क्षेत्रात सन २०१७, २०१८ व २०१९, २०२० चे उत्कृष्ट लघु उदयोजकांना पुरस्काराचे वितरण करावयाचे आहे.

सन २०१७

प्रथम पुरस्कार – श्री. जिग्नेश शाह, संचालक, मे. देश वायर प्राटक्टस् प्रा.लि.प्लॉट नं. डी – ३४, एम.आय.डी.सी. सिन्नर, नाशिक

व्दितीय पुरस्कार– श्री. संदिप भास्कर दळवी, मे. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल वर्क्स, प्लॉट नं. एन – १७, एमआयडीसी अंबड, नाशिक

 

सन २०१८

प्रथम पुरस्कार – श्री. भारत एम. ताजणे, मालक, मे. पॉवर इलेक्ट्राफनिकल, प्लॉट नं. डी – २४, एमआयडीसी अंबड, नाशिक

व्दितीय पुरस्कार- श्रीमती. मिना एम घोडके, चेअरमन, मे. महिला गृह उदयोग सह. सोसायटी लि. प्लॉट नं. १९/सी, यशवंत नगर, औंदाणे, ता.बागलाण जि.नाशिक

सन २०१९

प्रथम पुरस्कार – श्रीमती. भारती अभय खारकर, मालक, मे. प्रगती ईलटेक इंडीया, स.नं.४३४/१ गोंदे दुमाला, ता. इगतपुरी, जि. नाशिक

व्दितीय पुरस्कार- श्रीमती. स्वाती राजेंद्र महाजन, मालक, मे. डॅशटेक इंजिनिअर्स प्लॉट नं. एम-५७, एमआयडीसी अंबड, नाशिक

सन २०२१

प्रथम पुरस्कार – श्री. निखिल पांचाल, संचालक मे. पांचाल इंजिनिअर्स (इंडीया) प्रा.लि.प्लॉट नं-डी-६४ वडी -६६ एमआयडीसी अंबड, नाशिक

व्दितीय पुरस्कार- श्री. जगदिश दामोधर पाटील, मे.अल्फाटेक प्रोसेस इक्विपमेन्टनस् प्रा.लि. प्लॉट नं. डब्लु-१९४, एमआयडीसी अंबड, नाशिक

0000000000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.