Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वाचा: Redmi सह ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, फीचर्स आणि ऑफर्स लगेच पाहा
Xiaomi 12 Pro मध्ये हे खास:
फोनमध्ये ३२०० x १४४० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.७३-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट ४८० Hz आहे. हे डिव्हाइस १२० Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डिस्प्लेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कंपनी त्यात HDR10+ आणि डॉल्बी व्हिजन देखील देत आहे. याशिवाय डिस्प्ले संरक्षणासाठी तुम्हाला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देखील मिळेल.
वाचा: LAVA ची युजर्सना भेट, या 5G फोनवर करता येणार ४ हजारांपेक्षा अधिक सेव्हिंग, पाहा ऑफर्स
फोन 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 इंटर्नल स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Snapdragon 8 Gen 1 चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचे तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. त्याच वेळी, सेल्फीसाठी समोर ३२ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आणि एआय फेस अनलॉकने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये ४६०० mAh बॅटरी आहे, जी १२० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या चार्जिंगच्या बूस्ट मोडमध्ये फोन १८ मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. तर स्टँडर्ड मोडमध्ये चार्ज होण्यासाठी २४ मिनिटे लागतात. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर काम करतो.
वाचा: सॅमसंग स्मार्टफोन युजर द्या लक्ष, या टिप्स तुमच्या डिव्हाइसला ठेवतील Over Heating पासून सुरक्षित