Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
OnePlus Pad Details
वनप्लस पॅड संबंधी २०२१ पासून लागोपाठ माहिती समोर येत आहे. परंतु, आता वनप्लसच्या या डिव्हाइसला लाँच करण्यात येणार नाही. परंतु, आता अखेर चीनची कंपनी आपला पहिला टॅबलेट ७ फेब्रुवारी रोजी पडदा हटवणार आहे. OnePlus TV 65 Q2 Pro प्रमाणे वनप्लसचा पहिला टॅबलेट सुद्धा इंडियात एक्सक्लूसिव्ह असेल. वनप्लसने अपकमिंग टॅबलेटसंबंधी लाँचिंगची माहिती दिली आहे.
वाचाः Airtel ग्राहकांना मोठा झटका, सर्वात स्वस्त प्लान बंद, आता द्यावे लागतील ५७ टक्के जास्त पैसे
वनप्लसने आपल्या अधिकृत ‘Cloud 11’ इवेंटची मायक्रोसाइट वर एक प्रोमो फोटो शेअर करण्यात आला आहे. वनप्लस पॅडला स्लिक डिझाइन सोबत लाँच करण्याची शक्यता आहे. फोनला ऑल मेटल बॅक पॅनेल सोबत उपलब्ध करण्यात येवू शकते. टॅबलेट मध्ये रियरवर मध्ये भागी कॅमेरा मॉड्यूल असेल. याशिवाय, वनप्लसच्या या टॅबलेटला सेल्युलर कनेक्टिविटीसोबत लाँच केले जावू शकते. टॅबलेटला ग्रीन कलर मध्ये उपलब्ध केले जाईल. OnePlus 11 5G च्या सिग्नेचर स्कीममधील हा एक आहे. टॅबलेटला आणखी काही कलर ऑप्शन मध्ये आणले जावू शकते. वनप्लसने अजून पर्यंत टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन संबंधी खुलासा केला नाही. परंतु, रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लाँचिंग आधी वनप्लसच्या या टॅबलेटसंबंधी आणखी माहिती मिळू शकते.
वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?
वाचाः Google Doodle on Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने बनवले खास डूडल