Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कंगना रणौतने बुधवारी पठाण सिनेमावर कौतुकाचा वर्षाव केला होता. ‘पठाणसारखे सिनेमे नक्कीच चालायला हवेत,’ असं वक्तव्य तिनं केलं होतं. मात्र, शुक्रवारी कंगनानं स्वतःच्याच वक्तव्यावरून यूटर्न घेतला. बॉलिवूड क्वीनने सिनेमावर टीका करत म्हटले की, ‘या सिनेमात पाकिस्तानला चांगला देश दाखवलं आहे.’
कंगना रणौतनं पठाणला म्हटलं देशद्रोही
कंगनाने पठाण सिनेमावर ट्वीट करत टीकेची झोड उठवली आहे. ट्वीटच्या मालिकेमधून तिने पठाणवर कडाडून हल्ला केला. तिने ट्वीटमध्ये लिहिले की, ‘पठाण सिनेमा द्वेषावर प्रेमाने विजय मिळवता येतो असे जे लोक म्हणतात त्यांच्याशी मी सहमत आहे. परंतु कोणाचं प्रेम, कोणाचा द्वेष? ८० टक्के हिंदू इथं राहतात आणि तरीही सिनेमाचं नाव पठाण आहे. त्या सिनेमात आपला शत्रू असलेल्या पाकिस्तानला आणि आयएसआयएसला चांगलं दाखवलं आहे. हा सिनेमा यशस्वी ठरत आहे हेच भारताचं प्रेम आहे. ज्या प्रेमाने द्वेष आणि शत्रूची क्षुद्र राजनीतीवर विजय मिळवला आहे. परंतु ज्यांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की, पठाण फक्त सिनेमा असू शकतो. इथे फक्त श्रीराम जय श्रीराम हा नारा असेल.’
पठाण सिनेमानं ओलांडला १०० कोटींचा टप्पा
शाहरुख खानने (Shahrukh Khan) बुधवारी एक पोस्ट शेअर केली. त्याची पोस्ट करण जोहरनं इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं की, ‘एकाच दिवशी १०० कोटी आणि त्याहीपेक्षा अधिक… ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम मेगास्टार शाहरुख. आदित्या चोप्रा, सिद्धार्थ आनंद, दीपिका, जॉन! वाह!’ करणने या नोटमध्ये फटाक्यांच्या इमोजीची सीरिज शेअर केली. त्यानं पुढं लिहिलं आहे की, ‘प्रेम कायमच द्वेषावर विजय मिळवतं.’
पठाण बॉक्स ऑफिस कलेक्शन
शाहरुख खानच्या पठाण सिनेमाने (Pathaan Box Office Collection) बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा सिनेमा प्रदर्शित झाला. जगभरात सिनेमाने १०६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमात शाहरुख खानशिवाय दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणादेखील आहेत.