Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काय आहे संपूर्ण घटना?
प्राप्त माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील कान्हेरी इथल्या कारखान्यात काम करणारे मध्य प्रदेशातील मजूरवर्ग आपल्या कुटुंबासह राहतात. या कुटुंबातील अनिल शन्नीलाल उईके (वय २८ वर्ष, राहणार ब्रजपुरा ता. जुन्नारदेव जि. छिंदवाडा मध्यप्रदेश) आणि पुष्पेंद्र कनस कुमरे (वय २५ वर्ष, राहणार पसलाई जि. बैतुल मध्य प्रदेश) हे दोघे आणि त्यांचे आणखी दोन मित्र असे चौघे जण आंघोळीसाठी परिसरातीलच तलावाजवळ गेले, अन् पाण्यात उतरले असता तलावात दूरपर्यंत पोहत गेले.
दरम्यान दोघेही तलावात अचानक बेपत्ता झाले. यावेळी सोबतचे दोन्ही मित्र घाबरले व बाहेर आले आणि परिवारातील लोकांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती सायंकाळी बार्शीटाकळी पोलिसांनाही देण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय सोळंके हेही घटनास्थळावर हजर झाले. पाण्यात बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना बोलावले. लागलीच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू बोट व शोध बचाव साहित्यासह सर्च ऑपरेशन सुरू केले.
हेही वाचा : कार सनरुफमधून डोकवताना मांजाने गळा चिरला, मुंबईकर चिमुरड्याने आईच्या मांडीवर प्राण सोडले
त्यांच्या सोबत असलेल्या मित्रांनी ज्या ठिकाणी ते बुडाले ती जागा दाखवली. परंतु तिथे काही दिसून येत नव्हते, पण अंडर वॉटर सर्च केले असता तलावात तळाशी एक मोठी विहीर दिसून आली, त्यामध्ये सुमारे १५ ते २० फूट इतके खोल पाणी असल्याचा अंदाज आला. त्यानंतर या विहिरीत सर्च ऑपरेशन केले तेव्हा लागलीच तळाशी एक मृतदेह हाती लागला. तर दुसरा मृतदेह तिसऱ्या टप्प्यात सापडला. दोन्ही मृतदेहांवर वैद्यकीय तपासणी प्रक्रिया पार करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
हेही वाचा : महिलेने पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचं सांगितलं, नंतर घडलं असं काही की पत्नीला झाली अटक