Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अद्वय हिरे शिंदे गट आणि भाजपचं गणित बिघडवणार
अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर मालेगाव ग्रामीणमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. याबरोबरच शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या समोर देखील आव्हान निर्माण झालं आहेत. ठाकरे गटाची मालेगाव ग्रामीणमध्ये दादा भुसे यांच्या विरोधात ताकद वाढली आहे. दादा भुसे शिंदे गटात गेल्याने मालेगाव बाह्य मध्ये मोठ्या प्रमाणात ठाकरे गट कुमकुवत झाला होता. आता माजी मंत्री प्रशांत दादा हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अद्वय हिरे यांच्या ठाकरे गट प्रवेशाने दादा भुसे यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. अद्वय हिरे यांची संघटनात्मक बांधणी, संस्थांचं जाळं आणि महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं गेल्यास दादा भुसेंना धक्का बसण्याची शक्यता आहे. मविआ म्हणून निवडणूक न झाल्यास भुसे यांच्यासाठी ती दिलासादायक बाब ठरू शकते.
लोकसभा मतदारसंघांचं गणित बिघडणार
लोकसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील तीन आणि नाशिक जिल्ह्यातील तीन अशा एकूण सहा विधानसभा मिळून एक लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. या धुळे लोकसभा मतदार संघा दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही जागा देखील भाजपकडून शिंदे गटाकडे घेतली जाणार असल्याच्या चर्चा आहेत. याशिवाय भाजपचं मिशन ४५ देखील सुरु आहेत. भाजपकडून देण्यात आलेला उमेदवार किंवा अविष्कार भुसे यांच्यासमोर अद्वय हिरे यांच्यामुळं आव्हान उभं राहू शकतं. लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही ठिकाणी भाजप आणि दादा भुसे यांच्या शिंदे गटाचं गणित बिघडवण्यात अद्वय हिरे यशस्वी ठरू शकतात, असं म्हटलं जातंय.
कुलदीपमुळे चहलचा पत्ता होणार कट, पाहा पहिल्या T 20 सामन्यासाठी भारताची Playing XI
नाशिक जिल्ह्यात ठाकरेंना फायदा?
अद्वय हिरे यांच्या रुपात शिवसेना ठाकरे गटाला युवा नेता मिळाला आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील संस्थांचं जाळं अद्वय हिरे आणि पर्यायानं शिवसेनेसाठी फायदेशीर ठरु शकतं. अद्वय हिरे जिल्हाभर प्रचार करुन शिंदे गट, भाजप विरोधात सेनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.मालेगाव बाह्यसह विधानसभेच्या चार आणि एका लोकसभा मतदारसंघात हिरे यांची भूमिका गेमचेंजर ठरू शकते.
आधी थोरातांच्या घरात प्रवेश नाही, एकदाही भेट नाही; शुभांगी पाटलांनी थेट कारण सांगितलं
अद्वय हिरे कोण आहेत?
डॉ.अद्वय हिरे माजी मंत्री प्रशांत दादा हिरे यांचे पुत्र असून ते २००९ पासून भाजपमध्ये आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. डॉ.हिरे हे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे ते चेअरमन देखील आहेत.
सेनेतील पक्ष प्रवेशानंतर अद्वय हिरे काय म्हणाले?
“गोपीनाथ मुंडे यांना शब्द देत भाजपचं काम केलं. असंख्य लोकांना भाजपच्या पदांवर बसवलं. ५० गद्दार मांडीवर बसवल्यावर भाजपला आमची गरज राहिली नाही”, असं अद्वय हिरे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो पण पक्षानं आमच्याकडं दुर्लक्ष केलं. जो शेतकऱ्यांना वाचवू शकत नाही त्यांच्या नेतृत्त्वात काम करणं शक्य नसल्यानं हा निर्णय घेतला, असं हिरे यांनी सांगितलं. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना कशी उभी राहिलं यासाठी काम करणार असून महाराष्ट्रात शिवसेना पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार आहे, असं अद्वय हिरे म्हणाले. राज्यातील ४९ मतदारसंघातील भाजपचे लोक सेनेत येतील, तिथं त्यांची कुचंबणा होत आहे, असंही हिरे म्हणाले.
थोरातांचा पाठिंबा कुणाला? शुभांगी पाटलांना की तांबेंना? नगरमध्ये जाऊन पटोलेंनी थेट सांगितलं!
बालेकिल्ला शाबूत, मालेगावात भाजपला खिंडार, ठाकरेंना दादा भुसेंसमोर नवा पर्याय मिळाला