Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
२७ जानेवारी १९७६ रोजी मुंबईत श्रेयसचा जन्म झाला. त्याने कॉलेजपासून थिएटर करण्यास सुरुवात केली होती. त्याचा अभिनय पाहून त्याला मराठी मालिकांमध्ये काम मिळू लागलं. मराठीशिवाय श्रेयसने हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. ओम शांती ओम, गोलमाल सीरिज, वाह ताज, इक्बाल अशा हिंदी आणि मराठीमध्ये त्याने ४५ सिनेमांमध्ये काम केलं आहे.
इक्बालमधून श्रेयसने आपला हिंदी डेब्यू केला होता. या सिनेमात त्याच्या अभिनयाचं मोठं कौतुक झालं आणि त्याला मेनस्ट्रीम सिनेमात ऑफर मिळू लागल्या. श्रेयसने त्याच्या संघर्षाच्या काळातील दिवस आठवताना त्याने आपल्या करिअरमध्ये कधीही करण जौहर आणि यशराजच्या सिनेमात काम केलं नसल्याचं सांगितलं.
हेही वाचा – पहिल्या नजरेत प्रेम, चार दिवसांत प्रपोज; कॉलेज सेक्रेटरीच्या प्रेमात पडला होता श्रेयस तळपदे, अशी आहे फिल्मी लव्ह स्टोरी
श्रेयसच्या आयुष्यात असाही दिवस होता, ज्यावेळी त्याला एक सँडविच खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते की भाडं देण्यासाठीही पैसे नव्हते. त्याला घरुन स्टुडिओपर्यंत जाण्यासाठीही पैसे नसायचे. पण पुढे मेहनत आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने मोठं नाव कमावलं. आज श्रेयस कोट्यवधींचा मालक आहे. तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेतून श्रेयसच्या भूमिकेला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली. रिपोर्ट्सनुसार, श्रेयस या मालिकेच्या एका एपिसोडसाठी ४० ते ४५ हजार रुपये चार्ज करत असल्याची माहिती आहे. त्याशिवाय रिपोर्ट्सनुसार, श्रेयस एका सिनेमासाठी २ ते ३ कोटी रुपये फीस घेतो.
श्रेयस केवळ अभिनेताच नाही, तर दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. श्रेयस एका ओटीटी प्लॅटफॉर्मचा मालक आहे. २०२१ मध्ये त्याने Nine Rasa नावाचा एक ओटीटी प्लॅटफॉर्म तयार केला होता. ‘सीए नॉलेज’नुसार, श्रेयसचं नेटवर्थ ३७ कोटी रुपयांजवळपास आहे. तो अनेक ब्रँड्सद्वारे मोठी कमाई करतो.
श्रेयसचं मुंबईतील ओशिवारामध्ये एक ४००० स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे. त्याशिवाय वॉलडोर्फ बिल्डिंगमध्येही त्याचे दोन फ्लॅट आहेत. श्रेयसचं कार कलेक्शनही जबरदस्त आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंज, होंडा अकॉर्ड, ऑडी क्यू7 आणि ऑडी A8L अशा लक्झरी कार आहेत. या कार्सची किंमत १ ते १.५० कोटींच्या घरात आहे.
श्रेयसने मराठी, हिंदी मालिकांसह व्हाईस ओव्हरही केले आहेत. त्याने पुष्पा सिनेमासाठी अल्लू अर्जुनच्या भूमिकेसाठी आपला आवाज दिला. त्याआधी त्याने द लायन किंगच्या हिंदी वर्जनमधील एका पात्रासाठी आवाज दिला होता.