Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बापरे ! या App मधून ६ लाख विद्यार्थांसह १० लाख शिक्षकांचा डेटा लीक, पाहा डिटेल्स

7

नवी दिल्ली: Apps: सरकारच्या दिक्षा अॅपमधील त्रुटीमुळे सुमारे ६ लाख भारतीय विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाला झाल्याची माहिती एक अहवालातून समोर आली आहे. अॅपचा डेटा असुरक्षित क्लाउड सर्व्हरवर संग्रहित केला गेला होता, पण, डेटा नाव, ईमेल आयडीसह इतर माहिती उघड झाली. हे अॅप २०१७ मध्ये केंद्रीय मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाने (आता शिक्षण मंत्रालय ) प्रामुख्याने भारतातील शिक्षकांना अभ्यास सामग्रीसह सक्षम करण्यासाठी लाँच केले होते.

वाचा: या ब्रँडेड स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट, फीचर्स देखील आहे जबरदस्त

२०२० मध्ये कोविड १९ च्या ब्रेकआउटनंतर अॅपने विद्यार्थ्यांसाठी इयत्ता १ ते १२ दरम्यान इंटरॅक्टिव्ह पद्धतीने अभ्यास साहित्य जोडण्यास सुरुवात केली. वायर्ड च्या माहितीनुसार यूके-आधारित सुरक्षा संशोधकाने सरकारच्या दीक्षा मध्ये त्रुटी स्पॉट केल्या .

वाचा: या ७ नवीन शहरांमध्ये Airtel 5G ची एंट्री, युजर्सना मिळणार जबरदस्त इंटरनेट स्पीड

१० लाखांहून अधिक शिक्षकांचा डेटाही समोर :

अहवालात असे म्हटले आहे की, संपूर्ण नावे, फोन नंबर आणि दहा लाखांहून अधिक शिक्षकांचे ईमेल पत्ते यांसारखा डेटा क्लाउड सर्व्हरवर उघड झाला आणि असुरक्षितपणे ठेवला गेला. याव्यतिरिक्त, ईमेल पत्ते आणि फोन नंबरसह काही विद्यार्थ्यांचा डेटा अंशतः मास्क करण्यात आला होता. विद्यार्थ्यांची संपूर्ण नावे, त्यांच्या शाळांची माहिती, नावनोंदणीच्या तारखा आणि अभ्यासक्रम पूर्ण करणे यासह तपशील पूर्णपणे उपलब्ध होता. मायक्रोसॉफ्ट Azure वर होस्ट केलेला क्लाउड सर्व्हर असुरक्षित ठेवल्यामुळे काही उघड डेटा Google वर उपलब्ध होता.

डायरेक्ट बँकेशी संबंधित डेटा दीक्षा अॅपशी जोडलेला नाही. संशोधक ही जंग हान यांनी निदर्शनास आणून दिले की जोखमीची व्याप्ती “पारंपारिक बाल सुरक्षा चिंता” पेक्षा जास्त आहे. ती स्पष्ट करते, तुमच्याकडे मुलांचे नाव, संपर्क तपशील आणि ते कोणत्या शाळेत जातात याबद्दल माहिती असल्यास त्यांचे लोकेशन देखील सांगता येते.

वाचा: नवीन Smart TV खरेदी करायचा असेल तर, Amazon सेलमधील ऑफर्स एकदा पाहाच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.