Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
करिश्मा कपूरने सिनेमात काम करण्यासाठी शिक्षण सोडलं, कपूर कुटुंबाची परंपरा मोडत केलेला बॉलिवूड डेब्यू
कपूर कुटुंबाची एक परंपरा होती. तीच परंपरा करिश्मा कपूरने मोडित काढली. कपूर कुटुंबाची अशी परंपरा होती की या घरातील मुली सिनेमात काम करणार नाही. करिश्मा या कुटुंबातील पहिली मुलगी होती, जिने ही परंपरा मोडली आणि अभिनय, फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आणि सुपरहिटही ठरली. करिश्माच्या आधी शशी कपूर यांची मुलगी संजनानेही ही परंपरा मोडली होती, पण ती तितकंस यश मिळवू शकली नाही.
करिश्माने फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी तिचं शिक्षणही अर्धवट सोडलं होतं. तिने वयाच्या १७व्या वर्षी १९९१ मध्ये ‘प्रेम कैदी’ या सिनेमातून डेब्यू केला होता. त्यानंतर तिचे एकामागून एक अनेक सिनेमे फ्लॉप ठरले. त्यावेळी करिश्माचं करिअर संपलं असल्याच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या.
पण राजा हिंदुस्तानी आणि दिल तो पागल है सिनेमाने करिश्माला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर तिने एकामागून एक हिट सिनेमे दिले. ‘हसीना मान जाएगी’, ‘बीवी नं १’, ‘जुडवा’, ‘कुली नं १’, ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘हीरो नं. १’ अशा सिनेमातून तिने मोठं स्टारडम मिळवलं.
हेही वाचा – १३ वर्षांपूर्वी कोट्यवधींची पोटगी मिळाली, तरी दर महिन्याला करिश्माला का मिळतात १० लाख?
आधी साखरपुडा, मग लग्न मोडलं
करिश्माने तिच्या करिअरमध्ये मोठं यश मिळवलं असलं, तरी तिच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक चढ-उतार आले. करिश्मा आणि अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा होणार होता. पण हे नातं टिकू शकलं नाही. त्यानंतर करिश्माने २००३ मध्ये व्यावसायिक संजय कपूरसोबत लग्न केलं. काही वर्षांनी करिश्माने संजय कपूरवर घरगुती हिंसेचे आरोप करत २०१६ मध्ये त्याच्यासोबत घटस्फोट घेतला.
हेही वाचा – आज करिष्मा कपूर असती बच्चन घराण्याची सून; का मोडला अभिषेकसोबतचा साखरपुडा?
लग्नानंतर करिश्मा कलाविश्नापासून दूर होती. तिने २०१२ मध्ये ‘डेंजरस इश्क’ मधून कमबॅक केलं होतं. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला. २०२० मध्ये ती ‘मेंटलहुड’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. तसंच ती रिअॅलिटी शोमध्ये अनेकदा दिसते.