Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मेड इन इंडिया कंपनीची नवीन स्मार्टवॉच लाँच, कॉलिंग फीचर नाही परंतु, फोन रिसिव्ह करता येणार

6

नवी दिल्लीः मेड इन इंडिया कंपनी Maxima ने आपली नवीन स्मार्टवॉच Max Pro Samurai ला इंडियन मार्केटमध्ये लाँच केले आहे. Maxima Max Pro Samurai सोबत खास एक फीचर दिले आहे. या फीचर मुळे यूजर्सला कॉल रिसिव्ह करता येवू शकणार आहे. परंतु, कंपनीने या स्मार्टवॉचला नॉन कॉलिंग स्मार्टवॉच म्हटले आहे. जाणून घ्या डिटेल्स.

Maxima Max Pro Samurai च्या बॅटरीवरून दावा केला जात आहे की, यात १४ दिवसाचा बॅकअप मिळतो. मॅक्सिमाच्या या वॉच मध्ये हिंदी आणि इंग्रजीसह अनेक स्थानिक भाषेला सपोर्ट मिळतो. याची किंमत १,४९९ रुपये ठेवली आहे. या स्मार्टवॉचची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्टोरवर सुरू करण्यात आली आहे. वॉटर रेसिस्टेंटसाठी या वॉच मध्ये IP68 ची रेटिंग दिली आहे. म्हणजेच ही पाण्यात ३० मिनिटापर्यंत राहू शकते.

वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?

Max Pro Samurai मधील अन्य फीचर्स मध्ये यात १.८५ इंचाचा मोठी डिस्प्ले दिली आहे. याचा पीक ब्राइटनेस ६०० निट्स आहे. या वॉच सोबत स्क्रीन लॉक आणि इन स्क्रीन स्ट्रॅप बाइंड सोबत १०० वॉच प्लस वॉच फेसेज मिळतात. यात १०० प्लस स्पोर्ट्स मोड दिले आहे. यासोबत प्रीमियम मेटल ऑयल फिनिश मिळते.

वाचाः Airtel ग्राहकांना मोठा झटका, सर्वात स्वस्त प्लान बंद, आता द्यावे लागतील ५७ टक्के जास्त पैसे

नवीन वॉचच्या लाँचिंगवरून मॅनेजिंग पार्टनर मनजोत पुरेवाल यांनी म्हटले की, मॅक्सिमा मॅक्स प्रो समुराईला ग्राहकाच्या आपल्या आवश्यकतेनुसार, बनवण्यात आले आहे. ग्राहकांना या स्मार्टवॉच मध्ये TWS (हेडफोन) वर कॉल रिसिव्ह करण्याची सुविधा मिळते.

वाचाः Google Doodle on Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने बनवले खास डूडल

वाचाः Airtel ने लाँच केले दोन स्वस्त प्लान, ६० जीबी पर्यंत मिळतोय डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.