Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बेस्ट डील ! स्वस्त झाला iPhone 14 Pro, पाहा कुठे मिळतेय ऑफर

5

नवी दिल्ली:iPhone 14 Pro Price: आयफोन 14 प्रो खरेदी करणे तुमच्या विशलिस्टमध्ये असेल तर, ही वेळ योग्य असू शकते. कारण, या फोनवर सध्या प्रचंड डिस्काउंट मिळत आहे. आयफोन 14 प्रो तुम्ही फ्लिपकार्टवरून सहज खरेदी करू शकता. महत्वाचे म्हणजे लाँचच्या काही काळानंतरच तुम्ही iPhone 14 Pro एक-दोन नाही तर पूर्ण हजारांपर्यंत स्वस्तात खरेदी करू शकता. जाणून घेऊया आयफोन 14 प्रो वर उपलब्ध ऑफरबद्दल सविस्तर.

वाचा: नवीन Smart TV खरेदी करायचा असेल तर, Amazon सेलमधील ऑफर्स एकदा पाहाच

iPhone 14 Pro फीचर्समुळे तो चर्चेत राहतो. पण सध्या फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या ऑफर्समुळे ते किमतीबाबतही चर्चेत आहे. या फोनची MRP १,२९,९०० रुपये आहे आणि तुम्ही ५ % डिस्काउंटनंतर १,२२,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. यासोबत यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. कोटक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या मदतीने तुम्ही स्वतंत्रपणे १० % पर्यंत सूट मिळवू शकता.

वाचा: २०० MP कॅमेरासह येणारे हे स्मार्टफोन्स आता बजेटमध्ये खरेदी करता येणार, पाहा लिस्ट

iPhone 14 Pro : एक्सचेंज ऑफर

एक्सचेंज ऑफर अंतर्गत सर्वात मोठी सूट मिळत आहे. तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असल्यास तुम्ही तो फ्लिपकार्टवर एक्स्चेंज करू शकता. त्याऐवजी, तुम्हाला २०,००० पर्यंत सूट मिळू शकते. पण, ही सूट फोनच्या मॉडेल आणि कंडिशनवरही अवलंबून असते. कंपनीकडून फोनची १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. आज ऑर्डर केल्यावर हा फोन उद्या सकाळी ११ पर्यंत वितरित केला जाईल.

iPhone 14 Pro : फीचर्स

या फोनमध्ये 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. यासोबतच यामध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा ४८ MP आहे. यासोबतच यामध्ये १२ MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. यामध्ये A16 बायोनिक चिप देखील देण्यात आली आहे.

वाचा: नवीन आणि मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असल्यास या भन्नाट डील्स एकदा पाहाच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.