Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अरेरे! पळून जाऊन केलं लग्न, पण विवाहित निघाला नवरा; प्रेमाची अभिनेत्रीला मिळाली शिक्षा

7

प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री मंजू वॉरिअरकडे पाहिलं की कोणालाही वाटणार नाही की तिचं वय ४४ वर्ष आहे. आपल्या हसऱ्या चेहऱ्याने तिने फक्त मल्याळम सिनेप्रेमींचीच नाही तर देशभरातल्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मंजूच्या सौंदर्या समोर कोणतीही होतकरू अभिनेत्री फिकी पडेल यात काही शंका नाही. ​​मंजूची गणना दक्षिणेतील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘थुनिवू’ सिनेमातील मंजूच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंजूने वयाच्या १७ व्या वर्षापासून सिनेमात काम करायला सुरुवात केली. १९९५ मध्ये ‘सक्ष्यम’ हा तिचा पहिला सिनेमा होता. मंजूने आतापर्यंत जवळपास ४० सिनेमांमध्ये काम केलं असून अनेक राष्ट्रीय, फिल्मफेअर आणि राज्यशासनाचे पुरस्कार स्वतःच्या नावावर केले आहेत.

प्रेमात पडण्याची मंजूला मिळाली शिक्षा

मंजू हे भलेही सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव असेल, पण तिच्या सिनेमांची जेवढी यादी आहे तेवढीच यादी तिच्या आयुष्यातील वादांचीही आहे. यातही मंजूचं नाव घेतलं की तिचा पूर्वाश्रमिचा पती दिलीपसोबतच्या लग्नाचा वाद सगळ्यांना आठवतो. प्रेमाक आकंठ बुडालेल्या मंजूने पळून जाऊन दिलीपशी लग्न केले होते. दोघांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं, पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघांनी घटस्फोट घेतला. २०१५ मध्ये दोघे वेगळे झाले.

लग्नानंतर मंजूला दिलीपचं सत्य कळलं

लग्नानंतर मंजूला दिलीपचं सत्य कळलं

२० ऑक्टोबर १९९८ रोजी दिलीप आणि मंजूचे लग्न झाले. मंजूला भेटल्यावर दिलीप सुपरस्टार झाला. पण नंतर मंजूची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली. दिलीपचं आधीच लग्न झालं होतं हे त्याने मंजूला सांगितलं नव्हतं. दिलीपचं आधीच दूरची नातेवाईक असणाऱ्या एका महिलेशी लग्न झाले होते, त्यांच्या लग्नाची नोंदणीही झाली होती. दिलीपने १९९० मध्ये पदार्पण करण्यापूर्वीच लग्न केलं होते. फसवणूक झाल्यामुळे दुखावलेल्या मंजूने नंतर दिलीपपासून वेगळे होण्याचा निर्णय घेत.

मंजूला मिनाक्षी नावाची मुलगी आहे

मंजूला मिनाक्षी नावाची मुलगी आहे

त्यांना मीनाक्षी ही मुलगी आहे. दिलीप आणि मंजूच्या विभक्त होण्याचे कारण केवळ पहिलं लग्नच नाही तर पूर्वाश्रमिच्या पतीचं अफेअरदेखील आहे. मंजूशी घटस्फोट घेतल्यानंतर दिलीपने काव्याशी लग्न केले. वृत्तांवर विश्वास ठेवला तर दिलीप आणि काव्याच्या अफेअरच्या अफवा उडू लागलेल्या. त्यामुळेच मंजूने लग्न मोडण्याचा कठोर निर्णय घेतला. मंजू आता तिच्या वडिलांसोबत राहत असली तरी, मंजू आणि दिलीप दोघं मिळून मुलीचं पालन करतात.

ही तर नुसती सुरुवात होती

ही तर नुसती सुरुवात होती

मात्र, ही तर मंजूच्या त्रासाची केवळ सुरुवात होती. २०१७ मध्ये केरळमध्ये एका अभिनेत्रीच्या अपहरणाची घटना समोर आली होती. जिथे सहाजणांनी अभिनेत्रीचे अपहरण करून तिचे शोषण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पल्सर सुनी हा मुख्य आरोपी होता, तर दिलीप म्हणजेच मंजूचा पूर्वाश्रमिचा पती सहआरोपी असल्याचं निष्पन्न झालं. मुख्य आरोपीला पाठीशी घालणाऱ्या दिलीपलाही पोलिसांनी अटक केली होती.

तेव्हा मंजूने मान्य केलं

तेव्हा मंजूने मान्य केलं

पोलिसांनी या प्रकरणी मंजूची चौकशी केली असता, तिने दिलीपला घटस्फोट दिल्याचे सांगितले. मंजू दिलीपच्या याच त्रासांना कंटाळली होती. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर, दिलीपला वाचवण्याचेही मंजूने प्रयत्न केल्याचं बोललं गेलं. पुरावा नष्ट करण्यासाठी मंजूने आपला फोन अलुवा नदीत फेकल्याचा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केलेला. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दिग्दर्शकाने केलेली विचित्र पोस्ट

दिग्दर्शकाने केलेली विचित्र पोस्ट

अलीकडेच, मंजू पुन्हा चर्चेत आली जेव्हा दिग्दर्शक सनल कुमार शसीधरन यांनी तिच्याशी संबंधित एक विचित्र पोस्ट केली. मंजू वॉरिअरच्या जीवाला धोका असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केलेली. तिला तिच्या मॅनेजरने ताब्यात घेतले असून चार दिवसांपासून तिचा कोणताही पत्ता नाही. दिग्दर्शकाने तिच्याशी संपर्क करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. मात्र यावर कोणतीही कारवाई न झाल्याने शशिधरन यांनी नाराजी व्यक्त केली होती. हा कसला कायदा असा प्रश्नही त्यांनी विचारलेला.

अपघातांशी मेळ घालणं म्हणजे आयुष्य

अपघातांशी मेळ घालणं म्हणजे आयुष्य

मंजू वॉरिअरने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील चढ- उतारांबद्दल सांगितलं होतं. कोणताही पडदा न ठेवता अभिनेत्री म्हणाली होती की, ‘आयुष्य म्हणजे अचानक झालेल्या अपघातांशी मेळ घालणं आहे. माझ्या आयुष्यात असे अनेक चढ- उतार आले. पण आता मी परत उभी राहिले आहे. जशी मी पूर्वी अभिनय, गाणं, नृत्य करायचे तसेच मी पुन्हा करेन.’ मंजूने तिच्या आयुष्यातील कोणा एका घटनेवर भाष्य केलं नसलं तरी आता ती मागे वळून पाहणार नसल्याचंही ती यावेळी म्हणाली होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.