Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Box Office- अरे देवा! तिसऱ्या दिवशी अडखडला पठाण, तरीही केजीएफ २ ला देतोय टक्कर

8

मुंबई- ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले. शाहरुखच्या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड घट्ट केली होती. तिसऱ्या दिवशीही हीच जादू कायम राहिली. सिनेमाने तिसर्‍या दिवशी समाधानकारक कमाई केली.

शाहरुखच्या ‘पठाण’ने पहिल्या दोन दिवसांत देशभरात हिंदी पट्ट्यात १२३ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवसाच्या कमाईच्या आकड्यांचा अंदाज जो वर्तवण्यात आला होता तेवढा गल्ला कमावण्यात सिनेमाला अपयश आलं. मात्र गेल्या काही वर्षांत प्रदर्शित झालेल्या अनेक बिग बजेट हिंदी चित्रपटांच्या तुलनेत हा आकडा चांगला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, ‘पठाण’ने तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जवळपास ३५ ते ३६ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या वीकेंडला ‘पठाण’चं तीन दिवसांचं कलेक्शन १५८ ते १६० कोटींपर्यंत जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.


‘KGF 2’ ला मागे टाकण्यात ‘पठाण’ला मिळतंय यश

महामारीनंतर बॉक्स ऑफिसवर बराच काळ जो सुस्तपणा आलेला त्याचा फायदा दाक्षिणात्य सिनेमांनी घेतला. ‘KGF 2’ च्या नावावर बरेच रेकॉर्ड झाले आणि आता ‘पठाण’ या प्रत्येक चित्रपटाला मागे टाकताना दिसत आहे. शनिवार आणि रविवारला ‘पठाण’ची जादू चाहत्यांना भुरळ घालेल आणि चित्रपट धमाकेदार कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. रविवारपर्यंत हा चित्रपट फक्त हिंदीत २०० ते २५० कोटींचा टप्पा गाठू शकतो, असे बोलले जात आहे.

यूपी आणि बिहारच्या सिंगल स्क्रीन थिएटर्सवर जादू आहे

दरम्यान, सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, चित्रपटाने चांगली कमाई केली होती. तीच जादू पुन्हा एकदा यूपी आणि बिहारच्या सिंगल स्क्रीन थिएटर्सवर पाहायला मिळाली, जी यापूर्वी करण-अर्जुनच्या काळात पाहायला मिळाली होती. ही हिंदी सिनेमांसाठी सकारात्मक गोष्ट मानली जाते.

‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत आहे

शाहरुखच्या चित्रपटात जॉन अब्राहम एका दहशतवाद्याच्या भूमिकेत असून त्याच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. डिंपल कपाडियापासून आशुतोष राणापर्यंत अनेक नावाजलेले कलाकार चित्रपटात आहेत. चित्रपट बॉक्स ऑफिसवर नॉन हॉलिडेला प्रदर्शित करण्यात आला होता. पहिल्या दिवशी सिनेमाने जवळपास ५५ कोटी रुपये कमावले होते, ज्यामुळे हा चित्रपट पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये जवळपास ७० कोटी रुपयांची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दररोज इतिहास रचण्यात यशस्वी होत आहे.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.