Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पैज लावून भाजपला १०० जागा जिंकवून देणाऱ्या काकडेंचा अंदाज, कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपचा….

7

पुणे : भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून नुकतीच भाजपची एक बैठक पार पडली. या बैठकीत भाजप नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी नगरसेवकांना चांगलंच झापलं आहे. याविषयी संजय काकडे यांनी महाराष्ट्र टाईम्स ऑनलाइनशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली आहे.

नगरसेवकांनी काम केलेच पाहिजे. ती त्यांची नैतिक जबाबदारी असते. जर तुम्ही महानगरपालिकेत पाच हजार मतांनी निवडून येत आहात आणि या पोटनिवडणुकीत जर त्या ठिकाणी पाच हजाराचे लीड दिलं नाही. तर त्या ठिकाणी तुमचं लक्ष नाही असाच अर्थ होतो. त्यामुळे प्रभागात कमी मतदान पडेल त्या ठिकाणच्या नगरसेवकाचं तिकीट धोक्यात येईल. त्यामुळे महानगरपालिकेची पूर्वतयारी म्हणून ही निवडणूक पहा आणि लढा, असे सल्ले नगरसेवकांना दिल्याचं संजय काकडे यांनी महाराष्ट्र टाईम ऑनलाईनशी बोलताना सांगितलं.

चिंचवडची उमेदवारी जगतापांच्या घरातच

कसबा मतदारसंघातून 3 नावं वर जातील त्यातील जे नाव अंतिम होईल त्याच काम सर्वांना करावेच लागेल. मग गिरीश बापट यांनी टीम असेल किंवा माझ्यासारखे कार्यकर्ते असतील त्या सर्वांना हे बंधनकारक असेल असं संजय काकडे म्हणाले. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या घरीच तिकीट देण्यात येईल. मग लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला तिकीट द्यायचे की भावाला हा त्यांचा अंतर्गत विषय आहे पण उमेदवारी ही जगतापांच्या घरातच देण्यात येईल, असे काकडे यांनी स्पष्ट केले आहे.

व्यवस्थित नियोजन करून निवडणूक लढवली तर कसब्यात आमचाच विजय!

कोणतीही निवडणूक असेल तर राजकीय गणित मांडण्यात पंडित असणारे संजय काकडे यांनी चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचा परफॉर्मन्स कसा असेल यावर देखील भाष्य केलंय. चिंचवड मध्ये जगतापांच्या घरात उमेदवारी दिल्याने ती जागा आम्ही अधिक मताने निवडून येऊ मात्र कसब्यामध्ये योग्य नियोजन करून निवडणूक लढवली तर कसब्यात देखील आमचाच विजय होईल, असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्याचा अभ्यास नसल्याने संजय राऊत काहीही बोलत आहेत

नुकतेच शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक असल्याने त्या ठिकाणी आम्हाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. यावर संजय काकडे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय राऊत काय म्हणतात याला महत्त्व देण्याची गरज नाही. पण संजय राऊत यांना हेच माहिती नाही की, पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेनेची ताकद ही थोडी होती. 80 टक्के ताकद ही एकट्या श्रीरंग बारणे यांची होती. तेच श्रीरंग बारणे हे आमच्या घटक पक्षासोबत आहेत. त्यामुळे संजय राऊत यांना पुणे जिल्ह्याचा अभ्यास नसल्यामुळे ते काही बोलत आहेत, असं काकडे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतरच कसब्यात सक्रिय झालो

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संजय काकडे यांची भाजपच्या मंचावर उपस्थिती दुर्मिळ झाली होती. २०१७ च्या महानगर पालिकेत भाजपच्या विजयात महत्वाची भूमिका बाजवलेले काकडे अचानक साईड लाईन का झाले? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र पोटनिवडणूक जाहीर होताच काकडे पक्षाच्या प्रत्येक बैठकीत सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत. यावर देखील काकडे यांनी भाष्य केलं आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्या जिल्ह्यातील या दोन्ही पोटनिवडणूका असल्याने आम्ही अधिक गांभीर्याने घेतल्या आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसारच या दोन्ही पोटनिवडणुकीत मी लक्ष घातले आहे, असंही काकडे म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.