Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
30 Years Of Tiranga: राजकुमार यांच्यासोबत कामच करायचं नव्हतं! या अटीवरच नाना पाटेकरांनी दिलेला होकार
आजही लोकप्रिय असणाऱ्या सिनेमात देशासाठी प्राण देण्यासाठीही तयार असणाऱ्या ब्रिगेडियर सूर्यदेव सिंह आणि इन्स्पेक्टर शिवाजीराव वागळे यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. ब्रिगेडियर सूर्यदेव सिंहच्या भूमिकेत अभिनेते राजकुमार असून शिवाजीराव वागळे ही भूमिका नाना पाटेकरांनी साकारली होती. या सिनेमात मुख्य खलनायकाची भूमिका अर्थात प्रलयनाथ गुंडास्वामी ही भूमिका मराठमोळ्या दीपक शिर्केंनी साकारली. आजही पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
हे वाचा-आता माऊलीने तर ११ वर्षांपूर्वी वडिलांनी सोडलेली राखीची साथ; कशी आहे कुटुंबाची अवस्था?
नाना पाटेकरांची होती ही अट
एका अटीवरच नाना पाटेकर हा सिनेमा करण्यासाठी तयार झाले होते. दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी नाना पाटेकरांना हा सिनेमा ऑफर केला, त्यावेळी नानांनी व्यावसायिक चित्रपट करत नसल्याचे सांगत थेट नकारच दिलेला. तेव्हा मेहुल यांनी त्यांना स्क्रिप्ट ऐकून घेण्यास गळ घातली, त्यानंतर नानांनी होकार दिला पण त्यानंतर आणखी एका कारणामुळे चित्रपट करण्यास नकार दर्शवला. हे कारण होतं राजकुमार! स्क्रिप्टनुसार नानांचे यामध्ये अवघे १४ सीन होते. नानांना समजले की राजकुमार देखील चित्रपटात आहेत. तेव्हा नानांनी राजकुमार यांच्यासोबत काम करायचे नाही असे सांगितले. त्यांचा आणि राजकुमार यांचा स्वभाव जुळणार नाही, असे त्यांचे मत होते.
हे वाचा-बिग बॉस १६ जिंकण्याचं शिव ठाकरेचं स्वप्न राहणार अधुरं? लोकप्रियता झाली कमी
शेवटी मेहुल यांनी त्यांना कसेबसे समजावले. अखेर नाना एका अटीवर सिनेमा करण्यासाठी तयार झाले. त्यांनी मेहुल यांना सांगितले की सिनेमातील त्यांच्या एकाही सीनवर कात्री लागणार नाही. शिवाय त्यांनी असाही इशारा दिला की जर राजकुमार यांनी त्यांच्या शूटिंगदरम्यान हस्तक्षेप केल्यास ते तात्काळ फिल्म अर्धवट सोडतील. त्यावेळी मेहुल यांनी त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या होत्या. मेहुल यांनी एका मुलाखतीमध्ये याविषयी सांगितले होते.
राजकुमार यांना नाना वाटायचे उद्धट
जेव्हा मेहुल यांनी राजकुमार यांना सांगितले की त्यांनी नाना यांना ‘तिरंगा’साठी साइन केले आहे, तेव्हा त्यांचीही प्रतिक्रिया फारशी चांगली नव्हती. नाना यांना सिनेमात का घेतले, असा सवालच त्यांनी केला होता. मेहुल सांगतात की राजकुमार यांनी असे ऐकले होते की नाना उद्धट आणि शिव्या देणारे आहेत. दरम्यान मेहुल यांनी हेही स्पष्ट केले की सेटवर त्या दोघांमध्ये कोणताही तणाव नव्हता. एकमेकांशी ते व्यवस्थित बोलायचे. त्यांनी सांगितले की एका गाण्याच्या शूटिंगनंतर दोघांमधील मतभेद दूर झाले होते.