Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Akola : सहा जणांवर काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने चौघांचा, तर अपघातात दोघांचा मृत्यू

12

अकोला : जिल्ह्यातील वणी रंभापूर इथे एका कंपनीत मजूर काम करतात. श्रीकृष्ण वावगे (वय ३५, राहणार बोरगाव मंजू), चंद्रशेखर अप्तूरकर (वय ३०, राहणार काटेपूर्णा), विनोद वाघमारे (वय ३५, राहणार अन्वी, मिर्झापूर) हे तिघे कंपनी आवारातील विद्युत पोलवरील लाइट लावण्याचे काम करत असताना तिघांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांना तातडीने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. चंद्रशेखर अप्तूरकर आणि बोरगाव मंजू येथील श्रीकृष्ण वावगे यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू गावकऱ्यांनी तरुणाचा मृतदेह कंपनीसमोर आणून रोष व्यक्त करत कारवाईची मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच बोरगांव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाइकांसह ग्रामस्थांची समजूत काढली. कंपनीने नुकसान भरपाई देण्याची हमी दिल्याची माहिती आहे.

केबल तुटून, क्रेनमध्ये विद्युत प्रवाह; तर शेतातील…

क्रेनला विद्युत पुरवठा देताना इलेक्ट्रिक केबल तुटल्याने क्रेनमध्ये विद्युत प्रवाह झाला अन् क्रेन ऑपरेट करणारा मजूर जागीच मरण पावला. या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अकोला शहरातील तापडिया नगरात एका इमारतीचे काम सुरू असल्यामुळे बांधकाम साहित्य चढवण्याकरिता अहमद खान उस्मान खान (वय ४२) क्रेन ऑपरेट करत होते. क्रेनला इलेक्ट्रिक केबलद्वारे सप्लाय देण्यात आला. केबलला क्रेन व्हिल घासल्यामुळे इलेक्ट्रिक केबल तुटून क्रेनमध्ये विद्युत प्रवाह आल्यामुळे ही दुःखद घटना घडली. तर दुसऱ्या घटनेत भौरद गावात शेतातच एका शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेला. त्याला अचानक विद्युत बोर्डमध्ये बिघाड झाला अन् शॉक लागून ही घटना घडली. राजेश वासुदेव चांदुरकर, असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

लहान भावाचं करोनात निधन, आता मोठा भाऊ गेला; चांदूरकर कुटुंबाचं दु:ख बघून अख्खं गाव हळहळलं

दुचाकींच्या वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावरील बस व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरस्वार असलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील शळद फाट्याजवळ घडली. दुचाकीवरील जेलीन सिक्युरिया हा जागीच ठार झाला. दरम्यान अपघाताच्या दुसऱ्या घटनेत जिल्ह्यातील महान पिंजर रस्त्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. दुचाकीस्वार प्रमोद नारायण कदम यांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यात गोपाल रामचंद हातोलकर, मंगेश भोसले हे जखमी झाले. प्रमोद कदम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही घटनेत संबंधित पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

दोन मित्र बुडू लागले, एकमेकांचा हातही धरला, पण तलावाखालील विहिरीमुळे घात, अकोल्यात हळहळ

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.