Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
प्रसिद्धीने माझे मन खराब केले होते
रजनीकांत म्हणाले, ‘सिनेसृष्टीत आल्यानंतर पैसा आणि प्रसिद्धी किती वाढली असेल याची कल्पना करा. रोज सकाळी मला मटण पाय, अप्पम आणि चिकन खायला लागायचे. मी शाकाहारी लोकांकडे तुच्छतेने पाहायचो. मला आश्चर्य वाटायचं की ते हे सगळं कसं काय खाऊ शकतात. खरे सांगायचे तर, सिगारेट, अल्कोहोल आणि मांस हे अत्यंत धोकादायक आहे. जे या सर्व गोष्टी कोणतंही नियंत्रण न बाळगता करतात ते वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत स्वस्थ राहू शकत नाहीत.’
रजनी म्हणाले की, ‘अनेक लोकांना साठी येण्याआधीच अनेक व्याधींना आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. याची अनेक उदाहरणं आहेत. मला कोणाचा उल्लेख करायचा नाही.’ तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्या चांगल्या प्रकृतीचं कारण त्यांची पत्नी आहे. आपल्या पत्नीबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘तिनेच मला तिच्या प्रेमाने बदलले. प्रेमाने आणि डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने त्यांनी मला बदलले. त्याबद्दल वाय.जी.महेंद्र यांचे आभार.’ आकाशात सिगारेट फेकत ती तोंडात घेण्याच्या अनोख्या स्टाइलसाठी रजनीकांत प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये त्यांचा ट्रेडमार्क असलेली सिग्नेचर स्टेप आवर्जुन केली आहे. त्यांच्या या स्टाइलवरच कोट्यवधी चाहते फिदा आहेत.
धुम्रपानाचा ऑनस्क्रीन प्रचार जाणीवपूर्वक थांबवला
दरम्यान, चंद्रमुखी (२००५) या सिनेमापासून त्यांनी पडद्यावर या सवयीला प्रोत्साहन न देण्याचा निर्णय घेतला. पेट्टा (२०१९) या सिनेमात मात्र ते विजय सेतुपतीच्या सिगारेटमधून पफ ओढताना दिसतात. पण ते आपल्या संवादात पुढे म्हणतात की ‘हे आरोग्यासाठी चांगलं नाही. मी हे अनुभवातून सांगत आहे.’ त्याचप्रमाणे, काला (२०१८) मध्ये ते एका गाण्यात मद्यपान करताना दिसतात. मात्र चित्रपटात ते आपल्या बेफिकीरपणे वागण्याला दारुला दोष देतात. त्यांच्या या सवयीमुळे सिनेमात सिनेमात त्यांच्या पत्नीचा मृत्यू होतो.