Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रमेश देव यांच्या एका वाक्यावर सारंकाही ऐकायच्या सीमा देव, आजही आठवतं ते वाक्य

9

मुंबई- प्रेम कसं करावं ते कसं टिकवावं आणि ते कसं जगावं याचं उदाहरण द्यायचं झालं तर एकाच जोडप्याचं नाव डोळ्यासमोर येईल ते म्हणजे रमेश देव आणि सीमा देव. दोघं एकमेकांसाठीच जगले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज रमेश देव यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या याच स्पेशल बॉण्डच्या आठवणींना उजाळा देऊ.

मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन जोडपं कोणतं असा जर कोणी प्रश्न विचारला तर अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांचं नाव अग्रणी असेल यात काही शंका नाही. फक्त आपल्या अभिनयानेच नाही तर दोघांनी सदाबहार प्रेमकहाणीने लोकांच्या मनात स्थान मिळवलं. प्रेमात वय कधीच मध्ये येत नाही हे या जोडप्याने दाखवून दिलं होतं. रमेश देव हे पत्नी सीमा यांच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठे होते. रमेश यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पत्नीवर जिवापाड प्रेम केलं.

नलिनी सराफ (सीमा देव) यांनी मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवायला सुरुवात केली होती. नलिनी यांनी त्यांचे पडद्यावरचे नाव ‘सीमा’ ठेवले होते. त्यांनी १९६० मध्ये मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. ‘जगाच्या पाठीवर’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता, ज्यात रमेश देवदेखील होते. या पहिल्याच सिनेमापासून ही जोडी हिट झाली.

दोघांनी १९६२ मध्ये ‘वरदक्षिणा’ हा सिनेमा केलेला. चित्रपटाच्या कथेनुसार, सीमा यांना दुसऱ्या पुरुषाशी लग्न करण्यास मदत करताना रमेश यांचे पात्र प्रेमात पडते. हा तोच चित्रपट होता ज्यातून दोघांनाही एकमेकांबद्दलचे प्रेम वाटू लागले आणि त्याच वर्षी दोघांनी अधिक विलंब न करता लग्न केलं.
त्या एका वाक्यापुढे सीमा यांचं कधीच काही चाललं नाही

रमेश- सीमा यांच्या लग्नाच्या ५२ व्या वाढदिवसाला रमेश यांनी पत्नीला सुंदर हिऱ्याच्या बांगड्या भेट दिल्या होत्या. यावर अभिनेत्री म्हणाल्या होत्या की, ‘ते मला मुंबईतील एका ज्वेलर्सच्या दुकानात घेऊन गेले. मला महागड्या भेटवस्तू आवडत नाहीत, तरीही मला भेटवस्तू देण्याचा हट्ट ते नेहमीच करतात. ते मला भावनिकरित्या ब्लॅकमेल करत म्हणतात की, ‘काय माहीत मी उद्या तुझ्यासोबत असेन की नाही, त्यामुळे मला आज हे तुझ्यासाठी घेऊ दे.’

यादरम्यान, आपले जुने दिवस आठवताना सीमा यांनी पतीकडून मिळालेल्या पहिल्या भेटवस्तूचाही खुलासा केला होता. अभिनेत्री म्हणाल्या होत्या की, ‘आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसासाठी त्यांनी माझ्यासाठी हिऱ्याचे कानातले आणले होते आणि मी गेले ५२ वर्ष ते कानातले वापरत आहे.’

दरम्यान, रभिनेते रमेश देव यांचं गेल्यावर्षी २ फेब्रुवारी २०२२ रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.