Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
स्वस्तातील प्रोडक्ट्ससाठी बनावट खरेदी करू नका
अनेकदा या डील आणि डिस्काउंट मिळवण्यासाठी अनेक जण बनावट Apple चे प्रोडक्ट्स खरेदी करतात. हो, हे खरं आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, मोठी डील आणि डिस्काउंटच्या नावावर बनावट Apple प्रोडक्ट्सची विक्री केली जाते. Live Mint च्या रिपोर्टच्या हवाल्याने हा दावा केला जात आहे की, फेसबुक मार्केट प्लेसवर नवीन AirPods ला ५० ते ८० डॉलर म्हणजेच जवळपास ४ ते ५ हजार रुपयात विकले जात आहे. तर AirPods ची खरी किंमत २० हजार रुपये आहे. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, अखेर फेसबुक मार्केट प्लेसवरून २० हजार रुपये किंमतीचे AirPods फक्त ४ हजार रुपयात कसे काय विकले जात आहे. त्यामुळे असे म्हटले जावू शकते की, फेसबुक मार्केट प्लेसवर बनावट AirPods ची विक्री केली जात आहे.
वाचाः Airtel ने लाँच केले दोन स्वस्त प्लान, ६० जीबी पर्यंत मिळतोय डेटा, अनलिमिटेड कॉलिंग
कसे ओळखाल बनावट प्रोडक्ट्सला
- डील आणि डिस्काउंटच्या भानगडीत पडू नका.
- नेहमी विश्वसनीय साइट किंवा Apple स्टोरवरून प्रोडक्ट्स खरेदी करा.
- Apple प्रोडक्टच्या बॉक्सची डिझाइन जरूर चेक करा.
- Apple चे लेटेस्ट iOS 16 बनावट AirPods ला पेयर करण्यास नकार देवू शकते.
वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा
वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?