Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चर्चा ५० लाखांची; मिळाली गोपनीय माहिती, त्यानंतर…

18

अकोला : अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची धामधूम अकोला जिल्ह्यासह इतर चार जिल्ह्यात सुरू आहे. आता मतदानादरम्यान पैसे वाटले जात नाही ना? मतदारांना आमिष दाखवलं जात नाही ना? या अनुषंगाने निवडणूक आयोगासह पोलीस विभाग सतर्क आहे. यासाठी जिल्ह्यात पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एक संशयित व्यक्तीकडून ५० लाखांवर रोकड जप्त केली. मात्र तपासदरम्यान रक्कमचा खरा मालक निष्पन्न झाला असून ती रक्कम त्याला सुपूर्द केले असल्याचं पोलीस सांगतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रविवारी सायंकाळच्या सुमारास अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आले होते. यादरम्यान अकोट शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जात असल्याचं समजलं. पोलिसांनी त्या संशयित व्यक्तीला थांबवलं आणि त्याची झडाझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली. त्यानंतर त्याला अकोट शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आलं.

वाचा- टीम इंडियाच्या विजयात चहलने केला विक्रम; आजवर एकाही भारतीय गोलंदाजाला जमली नाही

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रोकडची मोजणी केली असता ही रक्कम जवळपास ५० लाख ९० हजार इतकी रुपयांची असल्याच समजते. रक्कम घेऊन जाणारे व्यक्तीची कसून चौकशी केली, त्यानंतर रक्कमचा खरा मालक ठाण्यात हजर झाला. अन् रोकडबद्दल त्याने कागदपत्र सादर केले. दरम्यान ही रोकड राजस्थान येथून अकोला जिल्ह्यातील विविध भागात चादर ब्लॅकेट्स विकण्यासाठी आलेल्या लोकांची असल्याच समजते. तसेच याचा मुख्य व्यापारी राज्यस्थान येथील असल्याचे बोलल्या जाते.

मतदानादरम्यान पैसे वाटले जात नाही ना? या दृष्टीने रोकड जप्त…

आकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी दिलेला माहितीनुसार, काल रविवारी सायंकाळी अकोट शहरात गस्तीदरम्यान एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली होती. त्यात अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अकोला जिल्ह्यात धामधूम सुरू आहे. कदाचित मतदानासाठीच ही रक्कम वापरली जात असावी असा संशय होता. यासाठी ही रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर रोकड घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची कसून करण्यात केली असून आता ‘ती’ राजस्थानच्या एका व्यापाऱ्याची असल्याचं समोर आलं. या रोकड संदर्भात कागदपत्राची तपासणी केल्यानंतर पूर्ण रक्कम संबधित व्यापाऱ्याला सुपूर्द केली, असेही अहीरेंनी सांगितले.

वाचा- कोण आहे खुशबू खान? ओळख ना पाळख टाइम्समधील बातमीनंतर मुंबईकराने दिले ३६ लाखांचे 3BHKचं घर!

दरम्यान, राजस्थान येथील अनेक लोक अकोला जिल्ह्यात विविध भागात घरोघरी जाऊन चादर आणि ब्लँकेट्स विक्रीचा व्यवसाय करत आहे. यादरम्यान मिळणारे पैसे हे नगदी आणि रोख असल्यामुळे तसेच त्यांच्याकडे बँक खाते नाही. म्हणून ही रक्कम एक साथ गोळा केली जाते आणि जेव्हा राजस्थानला या लोकांचा परतीचा मार्ग असतो, तेव्हा ही रक्कम सोबत घेऊन जात असतात, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.