Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लोकशाहीची व्याख्या सांगणाऱ्या चिमुकल्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल, थेट CMO मधून व्हिडीओ कॉल

8

मुंबई : लोकशाहीची आगळी वेगळी व्याख्या सांगून महाराष्ट्राच्या मनात घर करणाऱ्या जालन्याच्या चिमुकल्याची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल घेण्यात आलेली आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या बातमीनंतर मुख्यमंत्री कार्यालयातून कार्तिक वजीरला व्हिडीओ कॉल करुन त्याची विचारपूस केली गेली. कार्तिकला दृष्टीबाधा असल्याने त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात मोफत उपचार करुन देण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलं.

देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताकदिनी लोकशाही म्हणजे काय आणि आपल्या जीवनात क्षणोक्षणी लोकशाही कामी येते, हे कार्तिकने मिश्किल भाषेत सांगतानाचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला. काही तासांत ६ वर्षाचा चिमुकला कार्तिक महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा पठ्ठा नेमका आहे कोण आहे, कुठला आहे, त्याचे शिक्षक कोण आहेत? असे प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित झाले. त्यानंतर ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ने या चिमुकल्याचा शोध घेतला. कार्तिक जालिंदर वजीर असं या मुलाचं नाव आहे. मुळचा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवलगाव इथे पहिल्या इयत्तेत तो शिकतो. त्याला दृष्टीबाधा आहे. फार लांबचं त्याला दिसत नाही. शाळेतही त्याला पहिल्या बेंचवर बसावं लागतं.

कार्तिकचा दृष्टीबाधेचा त्रास लक्षात घेऊन आज मुख्यमंत्री कार्यालयातून वजीर कुटुंबियांना व्हिडीओ कॉल केला गेला. मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख तसेच एकनाथ शिंदे ओएसडी मंगेश चिवटे यांनी शिवसेना वैद्यकीय मदतकक्षाच्या मराठवाड्याचे प्रमुख दादासाहेब थेटे यांना कळवून कार्तिकच्या उपचारासाठी पूर्ण जबाबदारी घेतली. तसेच या व्हिडीओ कॉलमध्ये त्यांनी कार्तिकची आपुलकीने विचारपूस करत त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला. मुंबईत प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ तात्याराव लहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिकच्या डोळ्यांवर उपचार केले जातील, असं चिवटे यांनी सांगितलं.

दृष्टीदोष अन् बेताची परिस्थिती, लोकशाहीची भन्नाट व्याख्या सांगणाऱ्या चिमुकल्याची हृदयस्पर्शी कहाणी

कार्तिकची पार्श्वभूमी

कार्तिकचे वडील शेतकरी आहेत. घरची परिस्थितीही बिकट आहे. मुळातच खोडकर प्रवृत्तीचा कार्तिक दिसायला खूपच गोरापान असल्याने मित्र त्याला गमतीने भुऱ्या म्हणतात. पण व्रात्य, खोडकर आणि आपल्या मधुर वाणीने सगळ्यांना आपलंसं करणाऱ्या कार्तिकची दृष्टी कमी आहे. त्याची दृष्टी कमी झाल्यानं त्याला वर्गात फळ्याच्या समोरच बसावं लागतं. वर्गात मागे बसलेल्या कार्तिकला फळ्यावरचं काहीच वाचता येत नाही म्हणून शिक्षक भारत म्हस्के यांनी कर्तिकची चौकशी केली. त्यावेळेस त्यांना कर्तिकच्या निष्पाप आणि हसऱ्या चेहऱ्या मागचं दुःख कळलं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.