Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राखीवर हसणाऱ्यांना हे माहीत नसेल, स्वखर्चातून फुलवलेत भावंडांचे संसार…मराठमोळ्या मित्राची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

14

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतच्या आईचं नुकतंच निधन झालं.जुहूच्या क्रिटि केअर हॉस्पिटलमध्ये राखी सावंतची आई जया भेडा यांनी अखेरचा श्वास घेतला.जया भेडा यांच्यावर गेल्या तीन वर्षांपासून कॅन्सरचे उपचार सुरू होते. राखीनं आईला या आजारातून बाहेर काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केलं. मात्र त्यांचा हा लढा अपयशी ठरला.

अनेक सेलिब्रिटींनी राखीच्या दिवंगत आईचं अंत्यदर्शन घेतलं. तसंच अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. मराठी अभिनेता किरण माने यांनी देखील एक पोस्ट शेअर करत राखीचं सांत्वन केलं आहे. यापोस्टमध्ये किरण माने यांनी राखीची वेगळीच बाजू शेअर केली आहे.

राखी आणि किरण माने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात दोघांची चांगली मैत्री झाली. मैत्रिणीच्या आईचं निधन झाल्यानंतर किरण मानेही भावुक झाल्याचं पाहायला मिळाले.



काय आहे त्यांची पोस्ट?

माने, माझी आई गेली. माझा आधार गेला. मी पोरकी झाले…तुम्हाला माहीत आहे, माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती.मी काय करू आता? ओक्साबोक्शी रडणार्‍या राखीचे एकेक शब्द माझ्या काळजात कालवाकालव करत होते. जवळचा मित्र म्हणून फोनवरुन सांत्वन करण्याव्यतिरिक्त मी काहीही करू शकत नव्हतो. खूप हताश झाल्यासारखं वाटलं. आपल्या मैत्रीणीवर दु:खाचा पहाड कोसळलाय आणि आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही ही हतबलता मनाला घेरून टाकत होती.

बिग बॉसच्या घरात विकास आणि तेजस्विनीनंतर माझी खर्‍या अर्थानं कुणाशी मैत्री झाली असेल तर ती राखी सावंतशी! जे कारण विक्याशी मैत्री होण्याचं होतं तेच राखीशी. विपरीत परिस्थितीचा खडक भेदून उगवून येणारे अंकुर मनापासून भावतात. वरळीतल्या अतिशय गरीब घरात लहानाची मोठी झालेली एक मुलगी बॉलिवूडमध्ये यायचं स्वप्न बघते. वडिलांचा प्रचंड विरोध. पोलिस हवालदाराची नोकरी करणार्‍या आणि पदरात तीन मुली असणार्‍या बिचार्‍या बापाची तरी काय चूक हो? फिल्मी दुनिया तरूण मुलींसाठी घातक आहे हेच मनात ठाम बसलेलं. ते अक्षरश: घरात कोंडून ठेवतात. पण पोरीची जिद्द लैच खतरनाक. आई हे ओळखते. आपला सगळा सपोर्ट मुलीला देते. तिच्यासोबत घराबाहेर पडते आणि तिला सांगते, लढ तू. मी आहे खंबीर तुझ्यासोबत.

छोटं-मोठ्ठं कसं का असेना, पण राखीनं बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ते मिळवलेलं स्थान तब्बल सोळा वर्ष टिकवून ठेवलं ! खायचं काम नाही हे भावांनो ! हे सगळं करताना ती एक विसरली नाही की आईचा आधार नसता तर आपण इथे नसतो. राखीनं शेवट पर्यंत आईची मनापासून सेवा केली. आईचीच नव्हे, तर अख्ख्या घराची. अखेरच्या काळात वडिलांना सांभाळलं. दोन्ही बहिणींची लग्नं लावून दिली. स्वखर्चानं त्यांचे संसार उभे केले. भावाचा संसार सावरला. सगळ्यांना फ्लॅटपासून सगळं-सगळं घेऊन दिलं.शेवटच्या कॅन्सरच्या काळात तर आईला तिनं फुलासारखं जपलं.

असं म्हणत किरण यांनी राखीची वेगळी बाजू सर्वांसमोर आणली आहे.
अशी मुलगी प्रत्येकाला हवी! आईच्या काळजीने तिळतिळ तुटलेली राखी सावंत, जुना Video खूप रडवेल
राखीनं बिग बॉसमध्ये माझ्याशी अगदी निरपेक्ष,निर्भेळ, नितळ मैत्री केली. ती शेवटपर्यंत जपली. आम्ही पर्सनल आयुष्यातल्या अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या. मला जाणवलं की ‘माणूस’ म्हणून राखी शंभर नंबरी सोनं आहे ! बाहेर बोल्ड-बिनधास्त-बेधडक म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखीची हळवी बाजू मी बिगबॉसमध्ये पाहिली. काळजावर बसलेले अनेक घाव पचवून ती ताठ मानेनं उभी राहिली ती केवळ तिच्या आईकडं पाहून !
बिग बॉसच्या घरात आम्ही दोघे बोलत असताना कितीतरी वेळा ती आईच्या आठवणीनं रडली आहे. फॅमिली वीकमध्ये आई यावी, किमान आईचा व्हिडिओ तरी दिसावा म्हणून कासावीस झालेली राखी मी पाहिलीय.
राखी, आपण एकदा गप्पा मारत बसलोवतो. मी तुला एक शेर ऐकवला. “घर में धन, दौलत, हिरे, जवाहरात सब आए… लेकिन जब घर में मॉं आयी, तब खुशियां आयी !” तू अचानक रडायला सुरूवात केलीस. आईच्या आठवणीनं व्याकूळ झाली होतीस तू. राखी, सगळ्यात मोठ्ठं, वेदनादायी दु:ख कुठलं असेल तर डोक्यावरून आईची सावली दूर होण्याचं.

आम्ही किती आणि कसं सांत्वन करणार तुझं? तुलाच खंबीरपणे यातून बाहेर पडावं लागेल. पण मला एक माहितीय राखी, आईनंतर तुझ्या सगळ्यात जवळचं कोण असेल तर तो तुझा देव. त्या देवाजवळ तुझी आई गेलीय हे मनात ठेव. तिथे आता ती कायम ‘महफ़ूज़’ आहे ! मी पाहिलंय, रोज डोळे मिटून मनापासून प्रार्थना करतेस तू. त्यावेळी आता तुला देवासोबत आईही दिसेल, भेटेल. तू तिच्याशी खूप बोलू शकशील. हसवू शकशील तिला. तुझ्या खुश रहाण्यातच तिचा आनंद आहे, हे लक्षात ठेव. आम्ही जिवलग मित्र आहोतच तुझ्यासोबत.




Source link

Leave A Reply

Your email address will not be published.