Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दमदार परफॉर्मन्स आणि शानदार फीचर्ससह येणाऱ्या ‘या’ Tablets वर एक नजर टाकाच

8

नवी दिल्ली: Best Tabs: काही वर्षांपूर्वी टॅबलेट मार्केटमध्ये ऍपल आणि सॅमसंगचे वर्चस्व होते. गेल्या काही काळात मोठ्या स्क्रीनच्या टॅब्लेटची मागणी वाढली आणि इतर स्मार्टफोन कंपन्यांनी टॅब्लेट मार्केटमध्ये प्रवेश करण्याची संधी म्हणून याचा वापर केला. Xiaomi, Oppo आणि Realme सारख्या कंपन्यांकडे बजेटमध्ये शक्तिशाली फीचर्स असलेले टॅब्लेट आहेत.

वाचा: Jio-Airtel चा २९६ रुपयांचा प्रीपेड प्लान आहे बेस्ट, पाहा कोण देतय अधिक फायदे

Apple iPad 9th Gen:

9th Gen Apple iPad मध्ये A13 बायोनिक चिपसेट आणि 64GB इनबिल्ट स्टोरेज सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या टॅबलेटमध्ये रुंद बेझल्स आणि जुने होम बटण उपलब्ध आहे. या टॅबलेटमध्ये ३.५ mm हेडफोन जॅक आणि प्रीमियम मेटल बॉडी आहे. ३०,००० रुपयांखालील हा आयपॅड केवळ Appleचाच नाही तर, या किमतीच्या श्रेणीतही उपलब्ध असलेला सर्वोत्तम टॅबलेट आहे.

वाचा: WhatsApp कम्युनिटी ग्रुप्ससाठी येत आहे नवे फीचर, हे काम होणार सोपे

Xiaomi Pad 5:

Xiaomi Pad 5 हा प्रीमियम लुक असलेला एक शक्तिशाली Android टॅबलेट आहे. त्याचा ६ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट २६,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. हे डिझाईन, वैशिष्ट्ये आणि एकूण वापरकर्ता अनुभवाच्या दृष्टीने उत्तम उपकरण आहे. Pad 5 मध्ये 2K 120 Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले आहे, जो डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. हँडसेटमध्ये डॉल्बी अॅटमॉससह क्वाड-स्पीकर सेटअप आहे. हा टॅबलेट एलटीई कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करत नाही. पण, यात ड्युअल-बँड वाय-फाय सपोर्ट उपलब्ध आहे.

Realme Pad X:

Realme Pad X हा मोठ्या स्क्रीन आणि 5G कनेक्टिव्हिटीसह येणारा सर्वात स्वस्त Android टॅबलेट आहे. या Realme टॅबलेटच्या 5G व्हेरिएंटची देशात किंमत २७,९९९ रुपये आहे. Wi-Fi व्हेरिएंट फ्लिपकार्टवरून १९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. हा Realme टॅबलेट Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह येतो. या टॅबलेटमध्ये WUXGA+ रिझोल्यूशन स्क्रीन, क्वाड-कॅमेरा सेटअप, 8340 mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

ओप्पो पॅड एअर:

Oppo Pad Air मध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. १६,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत येणारा हा एक परवडणारा 4G टॅब आहे. या टॅब्लेटमध्ये 10.36 इंच टच स्क्रीन आहे, जे अरुंद बेझल डिझाइनसह येते. Oppo च्या या टॅबमध्ये मागील पॅनलवर ड्युअल-टोन फिनिश आहे. या टॅबमध्ये मागील बाजूस सिंगल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे.

वाचा: ३६५ दिवसांपर्यंत वैधता, मोफत कॉल, एसएमएस ऑफर करणारे हे प्लान्स एकदा पाहाच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.