Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मंगळ ग्रहावर कोणी बनवला अस्वलाचा चेहरा?; विचित्र आकृती पाहून शास्त्रज्ञांचीही उडाली झोप, पाहा काय आहे सत्य

6

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी एक आश्चर्यकारक गोष्ट पाहिली आहे. मंगळ ग्रहावरील एका खडकावर त्यांनी एक हसतमुख चेहरा पाहिला आहे. हा चेहरा अस्वलासारखा दिसत आहे. अ‍ॅरिझोना विद्यापीठाने २५ जानेवारी रोजी एक फोटो शेअर केला. या फोटोत दोन बटनांसारखे डोळे दिसत आहेत. त्याचा चेहरा वरच्या दिशेने आहे. NASA च्या Reconnaissance Orbiter च्या कॅमेराने १२ डिसेंबर २०२२ रोजी हे चित्र टिपले गेले आहे. हे छायाचित्र घेतले तेव्हा ऑर्बिटर २५१ किमी उंचीवर होते.

परंतु, मंगळावर अस्वलाचे चित्र खरेच कोणी काढले आहे का? विद्यापीठाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही बहुधा प्राचीन विवराची तुटलेली टेकडी आहे. एक मोठा गोल क्रॅक दिसतो, जो अस्वलाच्या डोक्यासारखा दिसतो, असे निवेदनात म्हटले आहे. त्याच्या मध्यभागी V आकार आहे. त्यामुळे अस्वलाचे नाक असल्याचा भास होतो. गोलाच्या आत दोन बटणासारखे ठिपके आहेत. हे ठिपके विशिष्ट ठिकाणी असल्याने ते डोळ्यासारखे दिसते.

क्लिक करा आणि वाचा- ते ठरले अखेरचे देवदर्शन, रामेश्वरमहून परतताना भीषण अपघात; भोकरदन, बीडच्या भाविकांचा मृत्यू

का दिसतो चेहरा?

हा फोटो पाहिल्यानंतर आपल्याला सहज धुळीने माखलेल्या खडकांमध्ये अस्वलाचा चेहरा दिसतो. या प्रकारचा आकार पॅरिडोलिया नावाच्या घटनेमुळे होतो. असे मनोवैज्ञानिक प्रवृत्तीमुळे घडते. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या इच्छेनुसार वस्तूंचा आकार पाहू शकतात. एखाद्याला समजू न शकणाऱ्या संगीतातही ती व्यक्ती त्याच्या मनाप्रमाणे शब्द ऐकते. अंतराळातील पॅरिडोलियाच्या घटनांसाठी अशा प्रकारची असंख्य चित्रे दिसू शकतात.

क्लिक करा आणि वाचा- नमणारही नाही, घाबरणारही नाही; आता सरपंचाला आली एसीबीची नोटीस, आमदार नाईक भडकले

नासा मंगळ ग्रहासाठी वेगवान रॉकेट बनवत आहे

अमेरिकी अंतराळ संस्था नासा अणुऊर्जेवर चालणारे रॉकेट बनवण्यात गुंतली आहे. मंगळ ग्रहावर जाण्यासाठी आतापर्यंत सुमारे ७ महिने लागतात. पण या प्रकारच्या रॉकेटच्या माध्यमातून आपण खूप वेगाने जाऊ शकणार आहोत. कारण अंतराळात जास्त वेळ राहणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अंतराळवीरांसाठी हा प्रवास जलद असणे आवश्यक आहे. सन २०१७ पर्यंत असे थर्मल रॉकेट इंजिन बनवण्याची नासाला आशा आहे.

क्लिक करा आणि वाचा- Adani Group ला तीन दिवसांत सर्वात मोठा फटका, अब्जावधी डॉलरचे नुकसान, गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत आणखी घसरले

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.