Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Disney+ Hotstar साठी वेगळे पैसे द्यायची गरज नाही. पाहा हे प्लान्स, सुरुवातीची किंमत १५१ रुपये

11

Best Plans : डिस्ने+हॉटस्टारची सदस्यता सध्या अनेक युजर्ससाठी खूप महत्त्वाची बनली आहे. जर तुम्हाला यासाठी वेगळा खर्च करायचा नसेल, तर तुम्ही अशा प्लान्ससह रिचार्ज करू शकता, ज्यामध्ये त्याचे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध असेल. Jio, Airtel आणि Vi अनेक प्रीपेड प्लानमध्ये हे सबस्क्रिप्शन मोफत देत असून यांची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. जिओच्या ५०० रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या कोणत्याही प्रीपेड प्लॅनमध्ये मोफत डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन उपलब्ध नाही. त्याच वेळी, Airtel कडे दोन आणि Vodafone-Idea चे ५०० रुपयांचे असे तीन स्वस्त प्लान्स आहेत, जे इतर फायद्यांसह Disney + Hotstar सदस्यत्व देतात. अशात, दीर्घकालीन प्लान्ससह रिचार्ज करताना तुम्हाला जास्त खर्च करायचा नसला तरी, तुम्हाला डिस्ने + हॉटस्टार नक्कीच मोफत मिळेल. खाली नमूद केलेल्या प्लान्समधून तुम्ही चांगला प्लान निवडू शकता.

Airtel 499 Plan

एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लान : युजर्सकरिता हा देखील देखील एक चांगला पर्याय आहे . भारती एअरटेलच्या ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज ३ GB डेटा मिळतो. सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगशिवाय, प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. अतिरिक्त फायदे म्हणून, डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सदस्यता ३ महिन्यांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. सदस्यांना अपोलो 24/7 सर्कलमध्ये ३ महिने प्रवेश, विंक म्युझिक सबस्क्रिप्शन, मोफत हॅलोट्यून्स आणि FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक असे फायदे देखील मिळतात.

Airtel 399 Plan

airtel-399-plan

एअरटेलचा ३९९ रुपयांचा प्लान: Airtel च्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता, दररोज २.५ GB डेटा व्यतिरिक्त, अमर्यादित कॉलिंग आणि प्रति दिन १०० SMS देखील सर्व नेटवर्कवर विनामूल्य उपलब्ध आहेत. यासोबत डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी, अपोलो 24/7 सर्कल ऍक्सेस ३ महिन्यांसाठी, विंक म्युझिक फ्री, फ्री हॅलोट्यून्स आणि FASTag वर 100 रुपये कॅशबॅक देखील उपलब्ध आहेत. तुम्ही एअरटेल युजर असाल आणि डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सदस्यता हवी असल्यास या प्लानचा विचार करू शकता.

VI 499 Plan

vi-499-plan

Vi चा ४९९ रुपयांचा प्लान : ४९९ रुपयांच्या Vodafone Idea प्लानमध्ये, युजर्सना २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज २ GB डेटा मिळतो आणि अमर्यादित कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. हा प्लान वीकेंड डेटा रोलओव्हर, रात्रभर अमर्यादित डेटा प्रवेश (सकाळी १२ ते सकाळी ६ दरम्यान) आणि 5GB अतिरिक्त डेटा ऑफर करतो. या प्लानची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये संपूर्ण १ वर्षासाठी Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. खास Disney + Hotstar साठी हा प्लान एक चांगला पर्याय ठरू शकतो.

VI 399 Plan

vi-399-plan

Vi चा ३९९ रुपयांचा प्लान: Vodafone Idea युजर्ससाठी ऑफर करत असेल्या ३९९ रुपयांच्या दुसऱ्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे, ज्यामध्ये दररोज २.५ GB डेटा मिळतो. या Vodafone Idea प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० SMS मिळतात. तसेच, याव्यतिरिक्त, Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी उपलब्ध आहे. यासह, कंपनी 5GB अतिरिक्त डेटा, Vi Movies आणि TV अॅपचा प्रवेश आणि रात्रभर अमर्यादित डेटा प्रवेश यांसारखे फायदे देत आहे. अधिक डेटा वापरणाऱ्यांसाठी हा प्लान एक चांगला पर्याय ठरू शकतो.

VI 151 Plan

vi-151-plan

VI चा १५१ रुपयांचा प्लान: Vodafone Idea कडे ग्राहकांसाठी अनेक जबरदस्त प्लान्स आहेत. विशेष म्हणजे या प्लान्सच्या किमती देखील जास्त नाही. कंपनी स्वस्तात ग्राहकांना अनेक फायदे देणारे प्लान्स ऑफर करते. Vodafone Idea च्या सर्वात स्वस्त Disney+ Hotstar प्लॅनची किंमत १५१ रुपये आहे. या Vodafone Idea प्लानमध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी उपलब्ध आहे आणि ३० दिवसांच्या वैधतेसह 8GB डेटा उपलब्ध आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या प्लानमध्ये अमर्यादित मोफत कॉलिंग किंवा दैनिक एसएमएससारखे फायदे उपलब्ध नाहीत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.