Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मेट्रो ११ बाबत नवीन अपडेट; मध्य-हार्बर रेल्वेमार्गावरील प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा

8

मुंबई : राज्य सरकारने वडाळा-जीपीओ भूमिगत मेट्रो ११ प्रकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे सोपावण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जानेवारी रोजी नगर विकास विभागाकडून एक जीआर काढण्यात आला. यात मेट्रो ११ चा प्रकल्प MMRC कडे सोपावण्यात आला आहे.

या मेट्रोचा १३ किलोमीटरचा लांबीचा कॉरिडॉर आहे. या मार्गावर १० स्टेशन्स असणार आहे. सीएसएमटी, कार्नेक बंदर, क्लॉक टॉवर, वाडी बंदर, दारूखाना, कोल बंदर, शेवडी मेट्रो, बीपीटी रुग्णालय, गणेश नगर, Hay Bunder अशी स्टेशन्स असणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी ८,७४० कोटी रुपये खर्च येणार आहे.

हेही वाचा – आता औरंगाबाद ते पुणे गाठता येणार अवघ्या दोन तासांत; गडकरींनी सांगितला फ्यूचर प्लान

मेट्रो ११ हा मेट्रो ४ ए (२.७ किलोमीटर गायमुख – कासारवडवली) आणि मेट्रो ४ (३२ किलोमीटर कासारवडवली – घाटकोपर – वडाळा) चा विस्तार असेल. यामुळे मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. या मार्गावर सीएसएमटीमधील मेट्रो ३ आणि मध्य रेल्वेवर इंटरकनेक्टिव्हिटी असेल.

हेही वाचा – Missing Link: मुंबई – पुण्याचं अंतर कमी होणार; जगातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा, इतक्या तासात होणार प्रवास

हा प्रकल्प MMRC कडे का सोपवण्यात आला?

मेट्रो लाइन 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कॉरिडॉरच्या अंमलबजावणीची जबाबदारी MMRC कडे सोपवण्यात आली आहे. या अनुभवाने एमएमआरसीला मुंबईच्या मेट्रो ११ चा प्रकल्प सोपावण्यात आला आहे. टनेल बोरिंग मशिन्स (TBMS), बोगद्याचं बांधकाम, ट्रॅक्स आणि संबंधित यंत्रणा बांधणं यामध्येही त्यांचा अनुभव असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

ठाणे जिल्ह्यातील जवळपास लोक प्रवासासाठी मध्य रेल्वेवर अवलंबून आहेत. मुंबई येण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने यामुळे या मार्गावर मोठी गर्दी होत असते. मात्र मेट्रो – ११ मुळे येथील प्रवाशांसाठी नवा पर्याय उपलब्ध होईल. मेट्रोने थेट मुंबईत येण्याची सोय होईल. त्यामुळे हार्बर, मध्य मार्गावरील लोकांना दक्षिण मुंबईत येण्यासाठी मेट्रोचा पर्याय उपलब्ध होईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.