Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जिओचे सर्वात स्वस्त ५ प्लान, २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत रोज मिळेल डेटा व अनलिमिटेड कॉलिंग

7

Jio Phone Prepaid Recharge Plans & Offers: देशातील खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ कडे आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीतील प्लान उपलब्ध आहेत. जिओ कंपनी प्रीपेड, पोस्टपेड, डेटा अॅड ऑन, इंटरनॅशनल रोमिंग शिवाय, जिओ फोन ग्राहकांसाठी कमी किंमतीत प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे. जिओ फोन रिचार्ज प्लान (JioPhone Recharge Plan) च्या ग्राहकांना ७५ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत प्रीपेड पॅक ऑफर करीत आहे. जिओ फोन यूजर्स (Jio Phone Users) कडे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ५ प्रीपेड प्लान (Prepaid Plan) ऑप्शन मिळते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशाच ५ प्रीपेड प्लान संबंधी माहिती देत आहोत. ज्याची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लानमध्ये काय काय बेनिफिट्स मिळतात, सविस्तर जाणून घ्या.

१८६ रुपयाचा प्लान

रिलायन्स जिओचा १८६ रुपयाचा प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना १ जीबी डेटा रोज मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण २८ जीबी डेटाचा फायदा या प्लानमध्ये मिळतो. रोजचा डेटा संपल्यानंतर याची स्पीड कमी होवून 64Kbps राहते. जिओ यूजर्सला या रिचार्ज पॅक मध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळते. याचा अर्थ ग्राहका देशातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करू शकतात. या प्रीपेड पॅक मध्ये रोज १०० SMS मिळतात. जिओच्या या पॅकमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

वाचा: Airtel युजर्स फ्रीमध्ये घ्या लाईव्ह TV, मुव्हीज आणि शोजची मजा, पाहा प्लान्स ​

१५२ रुपयाचा रिलायन्सचा जिओ प्लान

१५२ रुपयाचा रिलायन्सचा जिओ प्लान

रिलायन्स जिओचा १५२ रुपयाचा प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये ०.५ जीबी डेली डेटा या हिशोबाप्रमाणे एकूण १४ जीबी डेटा ऑफर केला जातो. डेली डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps राहते. जिओ फोन ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. हा प्लान एकूण ३०० SMS ऑफर करते. या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे फ्री अॅक्सेस दिले आहे.

वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा ​

१२५ रुपयाचा रिलायन्स जिओ प्लान

१२५ रुपयाचा रिलायन्स जिओ प्लान

रिलायन्स जिओचा १२५ रुपयाचा प्रीपेड पॅकची वैधता २३ दिवसाची आहे. या प्रीपेड पॅक मध्ये ०.५ जीबी डेटा रोज मिळतो. या हिशोबाप्रमाणे एकूण ११.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानमध्ये रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर ग्राहक 64Kbps या स्पीडने डेटा मिळवू शकतो. या प्लानध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करू शकतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. म्हणजेच ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच एकूण ३०० एसएमएस मिळते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.

वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती? ​

९१ रुपयाचा जिओ प्लान

९१ रुपयाचा जिओ प्लान

रिलायन्स जिओकडे ९१ रुपयाचा प्लान असून याची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये जिओ फोन ग्राहकांना एकूण 3GB (100MB रोज + 200MB एक्स्ट्रा) डेटा ऑफर केला जातो. प्लानमध्ये मिळणारा डेली डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps राहते. जिओ फोन ग्राहकांना या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगचा फायदा मिळतो. या रिचार्जमध्ये एकूण ५० एसएमएस मिळते. प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.

वाचाः Airtel ग्राहकांना मोठा झटका, सर्वात स्वस्त प्लान बंद, आता द्यावे लागतील ५७ टक्के जास्त पैसे ​

७५ रुपयाचा जिओ प्लान

७५ रुपयाचा जिओ प्लान

रिलायन्स जिओचा ७५ रुपयाचा प्लान असून याची वैधता २३ दिवसाची आहे. या रिचार्ज पॅक मध्ये रोज २.५ जीबी डेटा (100MB डेली + 200MB) रोज मिळतो. डेली डेटा संपल्यानंतर जिओ ग्राहक 64Kbps या स्पीडने इंटरनेट यूज करू शकतो. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर केली जाते. म्हणजेच ग्राहकांना ५० एसएमएसचा फायदा मिळतो. रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.

वाचाः भारतातील या दोन तरुण हॅकर्सनं करून दाखवलं, गुगलकडून जिंकले रोख २२ हजार डॉलर्सचे बक्षीस

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.