Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वाचा: ३६५ दिवसांपर्यंत वैधता, मोफत कॉल, एसएमएस ऑफर करणारे हे प्लान्स एकदा पाहाच
ट्विटरवर कोणत्या कारणांसाठी बंदी घातली जाऊ शकते?
गंभीर धोरणांचे उल्लंघन झाल्यास खाती निलंबित देखील केली जाऊ शकतात. गंभीर धोरण उल्लंघनांमध्ये बेकायदेशीर कॉनेन्ट किंवा क्रियाकलाप,एखाद्याला धमकावणे किंवा हानी पोहोचवणे आणि त्रास देणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. आगामी काळात कमी प्रकरणांमध्ये ‘गंभीर कारवाई’ केली जाईल, असे ट्विटरचे म्हणणे आहे.
वाचा: बेस्ट डील ! स्वस्त झाला iPhone 14 Pro, पाहा कुठे मिळतेय ऑफर
Elon Musk यांची नवीन घोषणा:
भविष्यात खाते निलंबित करण्याऐवजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्याचा रिच कमी करेल. किंवा युजर्सना ट्विट हटवावे लागेल. अकाउंट वापरण्यापूर्वी कंपनी ट्विट हटवण्यास देखील सांगू शकते.
एलन मस्क हे ट्विटर डीलच्या काळापासून अकाऊंट निलंबित करण्याला विरोध करत होते. डील पूर्ण झाल्यानंतर, अनेक लोकप्रिय ट्विटर अकाउंट्स रिस्टोर केली गेली आहेत, जी आधी बंद किंवा निलंबित करण्यात आली होती. या यादीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचाही समावेश आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचे खातेही रिस्टोअर करण्यात आले आहे. कंगना रणौतचे अकाउंट दोन वर्षांपूर्वी बॅन करण्यात आले होते. इलॉन मस्क सातत्याने ट्विटरमध्ये अनेक बदल करत आहेत.
आता प्लॅटफॉर्मवर तीन प्रकारचे व्हेरिफिकेशन बॅज दिले जात आहेत. जिथे सरकारी संस्था, अधिकारी आणि मंत्री यांना ग्रे रंगाचे बॅज मिळतात. त्याच वेळी, कंपन्यांना यलो बॅज देण्यात आले आहेत, तर वैयक्तिक युजर्सना ब्लू टिक्स मिळत आहेत.
वाचा: बेस्टच ! सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोनवर ३० हजारांचा ऑफ, फोनमध्ये 108 MP कॅमेरासह भन्नाट फीचर्स