Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पतीच्या आत्महत्येवर संशय, दशक्रियेच्या दिवशी पत्नीच्या तोंडाला काळं फासत धिंड,नाशिक हादरलं

22

नाशिक : जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिवरे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करणाऱ्या पत्नीची नातेवाईकांनी तोंडाला काळं फासून धिंड काढल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. शिवरे गावातील एका महिलेच्या पतीने आत्महत्या करत जीवन संपवलं. यावेळी त्याची पत्नी माहेरी होती. पत्नीने पतीची आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली. यामुळं तिच्या सासरच्या नातेवाईकांनी राग मनात ठेवून पतीच्या नातेवाईकांनी महिलेच्या तोंडाला काळे फासून चपलांचा हार घालत गावात धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील शिवरे गावात राहणाऱ्या पीडित महिलेच्या गाडीचा अपघात काही दिवसांपूर्वी झाला होता. अपघातात तिच्या हाताला दुखापत झाली असल्याने तिच्या पतीने तिला माहेरी सोडले होते. त्यानंतर काही दिवसांनी पतीने आत्महत्या केल्याची बातमी पीडित महिलेला समजली. संबंधित महिला पतीच्या दशक्रिया विधीसाठी महिला गावात पोहचली होती, मात्र पतीच्या नातेवाइकांनी तिला मारहाण केली.

Economic Survey 2023: बजेटपूर्वी आली गुड न्यूज! भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या पूर्वपदावर

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिवरे गावात पतीच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या पत्नीनं तिचा पती आत्महत्या करू शकत नाही, त्यांचा घातपात झाला आहे, असा संशय व्यक्त केला. तिनं पतीच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी सुरु केली.

चौकशीच्या मागणीमुळं संतप्त झालेल्या पतीच्या नातेवाइकांनी महिलेसह मुलांना आणि तिच्या नातेवाईकांना मारहाण केली आहे. इथंवरच हे प्रकरण न थांबता पतीच्या नातेवाइकांनी संबंधित महिलेच्या तोंडाला काळे फासले. तिच्या गळ्यात चपलांचा हारही घातला आणि गावभर धिंड काढली.

‘कोल्हाट्याचं पोर’ मधील आईचा घरासाठी वनवास संपेना; शांताबाई काळेंची परवड सुरूच

या संपूर्ण प्रकरणामुळं पीडित महिलेच्या नातेवाइकांनी पोलिसांत धाव घेत याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तक्रारीनंतर रात्री याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. चांदवड तालुक्यातील शिवरे गावातील या प्रकरणामुळं महिलांच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

म्हाडाच्या कार्यालयात तीन तास ठिय्या, अखेर अनिल परब पुरावाच घेऊन बाहेर आले, सोमय्यांना म्हणाले…

पवारांसाठी परंपरेला छेद, कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नात शरद पवारांची सपत्नीक उपस्थिती

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.