Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
CNG rates in Mumbai | सीएनजीच्या दरात कपात, वाहनधारकांना मोठा दिलासा. मुंबईत सीएनजी गॅसचे दर कमी होणार आहेत. यापूर्वी प्रतिकिलो सीएनजीसाठी ८९.५० रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता हा दर २.५० रुपयांनी कमी होऊन ८७ रुपये इतका होईल.
हायलाइट्स:
- सीएनजीच्या दरात कपात
- सीएनजी २.५० रुपयांनी स्वस्त होणार
महानगर गॅसकडून मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा केला जातो. त्यामुळे महानगर गॅसच्या नव्या निर्णयाचा फायदा अन्य भागांमध्येही होणार आहे. परिणामी मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या किंमतीमध्ये कपात झाली आहे. या निर्णयाचा फायदा सीएनजीवर चालणाऱ्या कार आणि विशेषत: रिक्षा आणि टॅक्सीचालकांना होणार आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना सीएनजी हा वाहनधारकांसाठी तुलनेत स्वस्त पर्याय होता. परंतु, पेट्रोल-डिझेलच्या बरोबरीने सीएनजीचे दरही वेगाने वाढत होते. त्यामुळे वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. महानगर गॅसने नोव्हेंबर महिन्यात सीएनजीच्या दरात ३.५० रुपयांनी वाढ केली होती. गेल्या वर्षभरात सीएनजीच्या किंमती ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे २०२२-२३ या वर्षात सीएनजीच्या वापरात घट झाली होती. मात्र, आता महानगर गॅसने सीएनजीच्या दरात २.५० रुपयांनी कपात करुन वाहनधारकांना काहीप्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.