Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, समतानगरात विकास गवळी हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. हातमजूरीचे काम करुन तो आपला उदरनिर्वाह करत होता. जळगाव शहरापासून २ किलोमीटर अंतरावर एक मंदिरात मंगळवारी दुपारी त्यांच्या कुटुंबातील एका लहान मुलाच्या जाऊळ देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विकास गवळी देखील उपस्थित होता.
हेही वाचा -अखेरचा मुलीचा चेहरा बघून घे, पतीला मेसेज; साडेतीन वर्षाच्या लेकीला कडेवर घेतलं अन् पत्नीने… नागपूर हादरलं
कार्यक्रम सुरु असताना मला थोडं काम असल्याचे सांगून तो थेट समता नगरातील राहत्या घरी आला. त्याने राहत्या घरातच दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. दुपारी ३ वाजता विकासचे आईवडील घरी आल्यानंतर त्यांना हा लक्षात आला. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला.
हेही वाचा -वर्गात शिकवतानाच मास्तरांची एक्झिट! हार्ट अटॅक येऊन खाली कोसळले, विद्यार्थी हमसून हमसून रडले
तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. याबाबत रामांनदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत पाठक करीत आहे.
हेही वाचा -आईला माहेरी पाठवलं, पोरीचा जीव घेतला, सकाळी अंत्यविधी; शुभांगीसोबत त्या रात्री नेमकं काय घडलं?