Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या

42

Nirmala Sitharaman Education Qualification:भारतीय रुपयाची घसरण होत नसून अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याचे विधान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर टीका केली जात आहे. निर्मला सितारमन यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या विद्यमान अर्थमंत्री, निर्मला सीतारामन यांनी महाविद्यालयात अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.

निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ रोजी मदुराई, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे वडील नारायण सीतारामन हे रेल्वेत काम करायचे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची शैक्षणिक पात्रता आणि करिअरविषयी जाणून घ्या.

अर्थशास्त्रात मिळवली पदवी
महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी जेएनयूमधून अर्थशास्त्रात एमए आणि नंतर एमफिलची पदवी प्राप्त केली आहे.

शिवसेनेच्या अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार ऋतुजा लटके कितवी शिकल्या? जाणून घ्या
करिअर ग्राफ
निर्मला सीतारामन यांनी लंडनमधील कृषी अभियंता असोसिएशनमध्ये अर्थशास्त्रज्ञ सहाय्यक म्हणून काम केले आहे. लंडनमधील प्राइस वॉटर हाऊसमध्ये त्यांनी वरिष्ठ व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे. त्यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमध्येही काम केले आहे. भारतात परतल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी स्टडीजमध्ये उपसंचालक म्हणून काम केले. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी PRANAVA नावाच्या शाळाची स्थापन केली होती.

वाइल्डलाइफ फोटोग्राफर ते संयमी शिवसेना पक्षप्रमुख, उद्धव ठाकरेंच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या

भारतीय रुपयाची घसरण नाही

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रुपयाची घसरण होत नसून अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पत्रकाराने विचारले, “भौगोलिक-राजकीय तणावादरम्यान रुपयाचे लक्षणीय अवमूल्यन झाले आहे. येणाऱ्या काळात रुपयासाठी तुम्हाला कोणती आव्हाने दिसत आहेत आणि तुम्ही त्यांना कसे सामोरे जाल?” यावर सीतारामन म्हणाल्या, ‘सर्वप्रथम, मला रुपयाची घसरण होताना दिसत नाही, पण अमेरिकन डॉलर (US Dollar) मजबूत होताना दिसत आहे. डॉलर मजबूत होत आहे. त्यामुळे साहजिकच ती चलने मजबूत होत असलेल्या तुलनेत कमकुवत होतील. इतर उदयोन्मुख बाजार चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया चांगली कामगिरी करत आहे. मात्र, रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. एका डॉलरचे मूल्य ८२.४२ भारतीय रुपया इतके झाले आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट सोडले होते कॉलेज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिक्षण किती? जाणून घ्या

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.