Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आणखी ३४ शहरात पोहोचले Jio True 5G, पाहा संपूर्ण शहराची लिस्ट

17

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ कंपनी आपल्या यूजर्ससाठी खूप वेगाने Jio True 5G सर्विस लाँच करीत आहे. कंपनीने आणखी ३४ शहरात जिओची ५जी सर्विस सुरू केली आहे. आता देशातील जिओ ५जी नेटवर्कच्या शहराची संख्या २२५ झाली आहे. आजच्या घडीला ५जी टेक्नोलॉजीने जोडणारे सर्वात जास्त ८ शहरे हे तामिळनाडू मधील आहेत. याशिवाय, आंध्र प्रदेशातील ६, आसाम आणि तेलगांना मधून प्रत्येक ३ – ३, छत्तीसगड, हरियाणा, महाराष्ट्र ओडिशा आणि पंजाब मधून प्रत्येक दोन – दोन शहराचा समावेश आहे. राजस्थान मधील अजमेर, कर्नाटक मधील चित्रदूर्ग, उत्तर प्रदेशातील मथुरा शहराचा या लिस्टमध्ये समावेश आहे.

रिलायन्स जिओने जास्तीत जास्त शहरात ५जी सर्विस देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या शहरात जिओ यूजर्सला वेल कम ऑफर अंतर्गत इनव्हाइट केले जात आहे. या यूजर्सला कोणत्याही अतिरिक्त शूल्क शिवाय, १ जीबीपीएस प्लस स्पीडवर अनलिमिटेड डेटा मिळत आहे. जिओने आणखी ३४ शहरात जि ट्रू ५जी लाँच करून आम्ही खूप आनंदीत आहोत. जिओच्या ट्रू ५जी ला जोडणाऱ्या शहराची संख्या आता एकूण २२५ झाली आहे. बीटा ट्रायल लाँचिंग वेळी केवळ १२० दिवसात जिओने २२५ शहरात लाँच करून एक रेकॉर्ड बनवला आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण देशात जिओ ट्रू ५जी सर्विस सुरू केली जाणार आहे, असे जिओच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा

पाहा जिओच्या शहराची लिस्ट
अनंतपूरम, आंध्र प्रदेश
भीमावरम
चिराला
गुंटाकाल
नांद्याल
टेनाली
दिब्रुगड, आसाम
जोऱ्हाट
तेजपूर
गया, बिहार
अंबिकापूर, छत्तीसगड
धामतेरी
थानेसर, हरियाणा
यमुना नगर
चित्र दुर्ग
जळगाव, महाराष्ट्र
लातूर, महाराष्ट्र
नाल्को
जालंधर, पंजाब
फागवारा
अजमेर, राजस्थान
कुड्डालोर, तामिळनाडू
दिंडीगुल
कांचीपूरम
करूर
कुंबकोनम
नागरकोईल
ठाणजावूर
तिरुवन्नमलई
अदिलाबाद, तेलंगाना
मेहबुबनगर
रामागुंडम
मथुरा, उत्तर प्रदेश

वाचाः Facebook वर चुकूनही सर्च करू नका ही नावं, अनेकांना भोगावा लागलाय कारावास

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.