Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. केतन कोठावळे विजयी

16

पुणे,दि.०१:- पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक २०२३ निवडणुकीत अ‍ॅड. केतन कोठावळे हे अध्यक्षपदी बहुमताने निवडून आले.पुणे शिवाजीनगर न्यायालयात सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले.
पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड. केतन कोठावळे यांनी अ‍ॅड. राहुल दिंडोकर यांचा १ हजार २३० मतांनी पराभव केला. कोठावळे यांना २ हजार ७२८ मते मिळाली.
उपाध्यक्षपदाच्या लढतीत अ‍ॅड. विश्वजीत पाटील यांना ३ हजार १० तर, अ‍ॅड. जयश्री चौधरी -बीडकर यांना २ हजार २३४ मते मिळून ते विजयी झाले. अ‍ॅड. राहुल कदम यांना २ हजार ७१९ व अ‍ॅड. गंधर्व कवडे हे २ हजार ४९१ मते मिळवून सचिवपदी विजयी झाले. खनिजदारपदाच्या लढतीत अ‍ॅड. समीर बेलदरे यांनी २ हजार ७९१ मते मिळवत विजय मिळविला. अ‍ॅड. अजय देवकर यांची  ऑडिटर म्हणून निवड झाली आहे.
बार असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. त्यात अमोल वडगणे, प्रमोद नढे, मयुरी कासट, संजय खैरे, रेश्मा चौधरी, श्रद्धा जगताप, राहुल प्रभुणे, ऋषिकेश कोळपकर, चंद्रसेन कुमकर, सचिन माने अशी कार्यकारिणी सदस्यांची नावे आहेत.
अ‍ॅड. अमित गिरमे यांनी मुख्य निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहिले.
त्यांना अ‍ॅड. दिलीप जगताप, अ‍ॅड. माधवी पोतदार, अ‍ॅड. शरद कुलकर्णी,
अ‍ॅड. कांताराम नप्ते आणि अ‍ॅड. सिद्धेश्वर चौधरी यांनी उपनिवडणुक अधिकारी म्हणून मदत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.