Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वाचा: Jio चा जबरदस्त प्लान ! ३ महिन्यांपर्यंत व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंग आणि हाय-स्पीड डेटा, किंमत नाही जास्त
एका चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर OnePlus च्या पोस्टनुसार आगामी OnePlus Ace TWS इयरबड्स चीनमध्ये OnePlus Ace 2 सोबत ७ फेब्रुवारी रोजी सादर केले जातील, जे चीनी मार्केटसाठी रीब्रँड केलेले OnePlus 11R असल्याचे मानले जात आहे.
वाचा: Disney+ Hotstar साठी वेगळे पैसे द्यायची गरज नाही, पाहा हे प्लान्स, सुरुवातीची किंमत १५१ रुपये
केससह बॅटरी लाईफ ३६ तासांपर्यंत:
OnePlus Buds Ace मध्ये डेडिकेटेड डायनॅमिक वेव्ह बास सिस्टम असल्याचे कन्फर्म करण्यात आले आहे. इअरबड्स सक्रिय आवाज रद्दीकरण (ANC) प्रदान करण्यासाठी ड्युअल-कोर नॉइज रिडक्शन चिपद्वारे खोल आवाज कमी करतात असे म्हटले जाते. कंपनीने असा दावाही केला आहे की, इयरबड्स चार्जिंग केससह ३६ तासांपर्यंत बॅटरी लाईफ देऊ शकतात. मात्र, इअरबड्सची बॅटरी क्षमता अजून समोर आलेली नाही.
टीझरनुसार OnePlus Buds Ace ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल, ज्याने ऑडिओ डिव्हाइसची लेटेंसी 47ms पर्यंत प्रभावीपणे कमी करण्याचा दावा केला आहे. OnePlus Ace 2, जो OnePlus 11R चे रिर्ब्रँडेड व्हर्जन असल्याचे मानले जात आहे. ते देखील Qualcomm च्या Snapdragon 8+ Gen 1 चिपसह चीनमध्ये OnePlus Buds Ace सोबत लाँच होण्याची अपेक्षा आहे.
OnePlus 11R मध्ये काय खास असेल?
OnePlus Ace 2 आणि OnePlus 11R मध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.७ इंच फुल-HD+ AMOLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. अधिकृत OnePlus India वेबसाइटवर पाहिल्याप्रमाणे OnePlus 11R म्हणून हँडसेट भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
वाचा: Bluetooth डिव्हाइसशी कनेक्ट होत नसेल तर बदला ‘या’ सेटिंग्स