Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Budget 2023: KYC अधिक सोपे होणार, मिळणार वन-स्टॉप सोल्यूशन, एकाच अ‍ॅपवर होणार काम

34

नवी दिल्ली: Budget 2023 : केवायसी संबंधित आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिजीलॉकर आणि Aadhar चा वापर एक-स्टॉप सोल्यूशन म्हणून केला जाणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज त्यांच्या Budget 2023 च्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. यासोबतच डिजीलॉकरसाठी वन स्टॉप केवायसी व्यवस्थापन प्रणाली तयार केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. अत्यावश्यक व्यावसायिक आस्थापनांसाठी Permanent Account Number (PAN) निर्दिष्ट सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी एक समान ओळखकर्ता म्हणून वापरण्यात येईल.

वाचा: धुमाकूळ घालायला येताहेत OnePlus चे स्वस्त इयरबड्स, बॅटरी लाईफ असेल ३६ तासांपर्यत

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाल्या की, डिजीलॉकर आता व्यक्तींसाठी एक-स्टॉप केवायसी देखभाल प्रणाली असेल, ज्यामुळे तुम्हाला कागदपत्रांमध्ये बदल करता येतील, जे तुमच्या डिजीलॉकरशी लिंक केलेल्या सर्व दस्तऐवजांमध्ये दिसून येतील. DigiLocker सेवा आणि Aadhar यांचा मूलभूत ओळख म्हणून वापर करून विविध सरकारी एजन्सी, नियामक आणि नियमन केलेल्या संस्थांद्वारे देखरेख केलेल्या व्यक्तींची ओळख आणि पत्ते जुळण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी एक-स्टॉप सोल्यूशन सेट केले जाईल. त्यांनी नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसीबद्दल देखील सांगितले, जे स्टार्टअप्स आणि अकादमींद्वारे नावीन्य आणि संशोधन आणेल.

वाचा: Disney+ Hotstar साठी वेगळे पैसे द्यायची गरज नाही, पाहा हे प्लान्स, सुरुवातीची किंमत १५१ रुपये

डिजीलॉकर फोनमध्ये प्री-इंस्टॉल असेल:

डिजिटल इंडियासाठी सरकार डिजीलॉकर आणि ऑनलाइन डॉक्युमेंटेशनला प्रोत्साहन देत आहे. अशात लवकरच फोनमध्ये डिजिलॉकर आधीच इन्स्टॉल होणार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, ते Google Play Store वरून स्वतंत्रपणे डाउनलोड करण्याची आवश्यकता नसेल.

डिजिलॉकर:

डिजीलॉकर हा डिजिटल इंडिया अंतर्गत भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आणि प्रमुख कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश भारताला डिजिटली सशक्त समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत बदलण्याचा आहे. या सुविधेच्या मदतीने, तुम्हाला ऑनलाइन क्लाउड सेवा मिळते, ज्याच्या मदतीने तुम्हाला कागदपत्रे कायम जवळ बाळगण्याची गरज नाही. या अॅपमध्ये तुम्ही आधारपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि मार्कशीटपर्यंत सर्व सेव्ह करू शकता.

वाचा: ३ महिन्यांपर्यंत रिचार्जचे टेन्शन नाही, रोज २.५ GB डेटा, फ्री कॉल आणि OTT,पाहा हे प्लान्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.