Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Big Breaking : अदानी एंटरप्राइजचा एफपीओ मागे, २० हजार कोटी परत करणार, हिंडेनबर्ग इफेक्ट?

18

मुंबई: अदानी एंटरप्रायझेसच्या एफपीओबाबत अदानी ग्रुपने एक मोठा निर्णय घेतला आहे. अदानी समूहाने आपला FPO मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्राइजकडून २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी समुहाच्या संचालक मंडळात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी समूहाकडून पत्रक काढून हा निर्णय जाहीर करण्यात आला.

कंपनीने नुकतेच अदानी एंटरप्रायझेसचे एफपीओ जारी केले होते आणि ३१ जानेवारीपर्यंत गुंतवणूकदारांना येथे पैसे गुंतवण्याची संधी होती. पण, अर्थसंकल्पाच्या दिवशी कंपनीने आपला एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचं आश्वासनही दिलं आहे. कंपनीने एक निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली. यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा-ITR: Income Tax रिटर्न म्हणजे काय आणि ते भरण्याचे काय आहेत फायदे, अगदी सोप्या भाषेत समजून घ्या

सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलंय. पूर्ण झालेले व्यवहार माघारी घेत आपल्या गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेत एफपीओ मागे घेत असल्याचं सांगितलंय. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर कंपनीच्या समभागाची रक्कम ऑफर प्राईजच्याही खाली गेल्याचं बघायला मिळालं होतं. गुंतवणूकदारांच्या हितार्थ हा निर्णय घेत असल्याचं अदानींचं म्हणणं आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन

कंपनीने २० हजार कोटी रुपये उभारण्यासाठी FPO जारी केला होता. हा FPO २७ जानेवारी रोजी उघडण्यात आला आणि ३१ जानेवारी ही त्याची शेवटची तारीख होती. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ते गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) सह काम करत आहेत.अदानी एंटरप्राइजचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी निवेदनात म्हटले आहे की, मंडळ सर्व गुंतवणूकदारांचे आभार मानतं, ज्यांनी एफपीओमध्ये पैसेही गुंतवले.

हेही वाचा-मोदींचा अर्थसंकल्प अदानींच्या शेअर्समधील घसरण थांबू शकला नाही; काहींना तर लोवर सर्किट

गेल्या आठवड्यात शेअर्समध्ये चढ-उतार असतानाही गुंतवणूकदारांनी कंपनीवर विश्वास दाखवला. हिंडेनबर्ग अहवालानंतर, अदानी समूहाच्या समभागात सतत घसरण होत होती, त्यानंतर कंपनीने निर्णय घेतला की घसरणीदरम्यान एफपीओ आणणे नैतिक नाही, असं गौतम अदानी यांनी म्हटलं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.